भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट कर्मधारांमध्ये गणल्या जाणाऱ्या धोनीच्या नावावर एक शानदार विक्रमाची नोंद आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात आयसीसी ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार आहे.
जुलै २०१९ला विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर धोनी भारतीय संघापासून दूर होता. दरम्यान त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधान आले होते. पण, धोनीने स्वत: आपली निवृत्ती जाहीर करत सर्व चर्चांवर विराम लावला. पण, अनेकांनी धोनीच्या अचानक निवृत्ती जाहीर करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनीही त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Inzamam Ul Haq Feels That MS Dhoni Should Announce His Retirement On Ground
इंजमाम त्यांच्या युट्यूब चॅनल ‘द मॅच विनर’वर बोलताना म्हणाले की, “धोनीचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत, ज्यांना पुन्हा धोनीला क्रिकेट खेळताना पाहायचे होते. मला वाटते की, एवढ्या मोठ्या खेळाडूने घरी बसून निवृत्तीची घोषणा करायला नको होती. तो मैदानावर निवृत्तीची घोषणा करु शकत होता. हेच मी सचिन तेंडूलकरलाही म्हणालो होतो की, धोनी असे करु शकत होता. माहीची फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे आणि मी त्याला भारतीय संघाचा सर्वात्कृष्ट कर्णधार मानतो.”
इंजमाम धोनीची प्रशंसा करताना म्हणाले की, “धोनीला माहित होते की, शानदार खेळाडू कसे बनतात. त्याचा क्रिकेट समजण्याचा दर्जा खूप मोठा होता. तो खेळाडू निवडायचा आणि त्यांच्याकडून त्यांचे उत्तमोत्तम प्रदर्शन करुन घ्यायचा. त्याने सुरेश रैना आणि आर अश्विनलाही स्टार बनवले आहे. जर धोनीने सर्वांसमोर निवृत्तीची घोषणा केली असती. तर त्याचे चाहते खूप आनंदी झाले असते. जरी धोनीचा आंतरराष्ट्रीय प्रवास थांबला असला, तरी तो लवकरच युएईत आयपीएल खेळताना दिसणार आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बाय बाय करणारा धोनी अचानक आयपीएलही सोडणार? ‘या’ व्यक्तीला वाटतेय भीती
ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ २ महिला क्रिकेटपटू अडकल्या लग्नबंधनात, पहा फोटो
झिवाला येतेय एमएस धोनी आणि त्याच्या बाईक राइडची आठवण, फोटो होतोय व्हायरल
ट्रेंडिंग लेख –
धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
आयपीएल २०२०: या ३ खेळाडूंची मुंबई इंडियन्सला भासू शकते उणीव
धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा