क्रिकेटच्या इतिहासात काही नवे रेकाॅर्ड बनत राहतात, तर काही तुटतात देखील. काही दिग्गज खेळाडूंनी तर काही असे रेकाॅर्ड्स बनवून ठेवलेत जे कोणत्याही फलंदाजासाठी मोडीत काढणे अशक्य आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam-ul-Haq) याला कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विश्वविक्रम करण्याची संधी होती, मात्र ही संधी त्याच्या हातून निसटली. इंझमाम उल हकने दावा केला आहे की, ब्रायन लाराच्या (Brian Lara) आधी तो कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 400 धावा करू शकत होता.
ब्रायन लारा (Brian Lara) हा कसोटी क्रिकेटच्या एका डावात 400 धावा करणारा जगातील पहिला आणि एकमेव फलंदाज आहे. ब्रायन लाराचा हा रेकाॅर्ड 2004 पासून अद्याप कायम आहे. कोणत्याही फलंदाजाला या रेकाॅर्डपर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप यश आले नाही.
इंझमाम उल हकने (Inzamam-ul-Haq) 2002 मध्ये लाहोरमध्ये न्यूझीलंडविरूद्ध 329 धावांची खेळी केली होती. इंझमामने एकदा त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले होते की, “न्यूझीलंडविरूद्धच्या या सामन्यात मला वाटले की, मी 400 धावा करू शकेन. मला हनिफ मोहम्मदचा रेकाॅर्ड मोडण्याची संधी नक्कीच होती, पण शेवटचा फलंदाज म्हणून मी बाद झालो. हनीफ मोहम्मदने 1958 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध 337 धावांची खेळी केली होती.”
इंझमाम म्हणाला होता की, “मी कधीही रेकाॅर्ड्ससाठी खेळलो नाही. पण इतर फलंदाजांनी मला साथ दिली असती तर मी 400 धावा करू शकलो असतो. मी ज्या पद्धतीने फलंदाजी करत होतो त्यामुळे न्यूझीलंडचे सर्व गोलंदाज थकले होते.”
महत्त्वाच्या बातम्या-
उचलली जीभ, लावली टाळ्याला!; म्हणे, “पाकिस्तान भारताला कसोटी मालिकेत पराभूत करू शकतो”
कसोटीमध्ये व्हाईटवाॅश देऊन मालिका जिंकणारे टाॅप-5 संघ
पाकिस्तानी खेळाडूची मैदानावर विचित्र कृती, पॅट कमिन्सला हसू आवरेना; VIDEO पाहा