---Advertisement---

पाकिस्तानी खेळाडूची मैदानावर विचित्र कृती, पॅट कमिन्सला हसू आवरेना; VIDEO पाहा

---Advertisement---

अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी शानदार कामगिरी करणाऱ्या कामरान गुलामला आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्येही पदार्पणाची संधी मिळाली आहे. जरी तो आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात काही विशेष करू शकला नाही, परंतु त्यानं सामन्यादरम्यान अशा काही कृती केल्या, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सलाही हसू आवरता आलं नाही.

वास्तविक, ही घटना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीदरम्यान 17व्या षटकात घडली. या षटकात कांगारुंचा कर्णधार पॅट कमिन्स गोलंदाजीसाठी आला होता. या षटकातील चौथा चेंडू त्यानं गुलामच्या पॅड्सवर टाकला. मात्र आधीच सतर्क असलेल्या गुलामनं हा चेंडू सुंदरपणे डिफेन्ड केला. यानंतर त्यानं लगेचच स्टीव्ह स्मिथच्या शैलीत बॅट दाखवत सहकारी फलंदाजाला रन घेण्यापासून रोखलं. पाकिस्तानी फलंदाजाची ही कृती पाहून कमिन्सलाही आश्चर्य वाटलं आणि त्याला हसू आवरता आलं नाही.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ अनेकदा बॉल डिफेन्ड केल्यानंतर आपल्या सहकाऱ्याला वेगळ्याच स्टाईलमध्ये थांबवताना दिसतो. केवळ स्मिथच नाही तर ऑस्ट्रेलियाचा आणखी एक फलंदाज मार्नस लॅबुशेन देखील मैदानात अशाच प्रकारची कृती करतो. मेलबर्नमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कामरान गुलामनं असं करताच कमिन्स आपलं हसू रोखू शकला नाही. मात्र, त्याच षटकाच्या पुढच्या चेंडूवर त्यानं गुलामला बाद केलं.

कमिन्सचा हे एक तिखट शॉर्ट पिच बॉल गुलामला अजिबात समजू शकला नाही. त्याचा परिणाम असा झाला की चेंडू त्याच्या ग्लोव्हजची कड घेऊन विकेटकीपरच्या हातात गेला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात गुलामनं पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकूण 6 चेंडूंचा सामना केला. या दरम्यान तो एका चौकाराच्या मदतीने 5 धावा करून बाद झाला.

 

हेही वाचा – 

मिचेल स्टार्कनं मोडला महान ब्रेट लीचा मोठा रेकॉर्ड! अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
कोच गौतम गंभीरवरील दबाव वाढला, बॉर्डर-गावस्कर मालिका ‘करो या मरो’!
रोहित शर्मा फलंदाजीत फ्लॉप का होतोय? माजी खेळाडूनं कारण सांगितलं, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---