पाकिस्तान क्रिकेटचा सध्या भोंगळ कारभार सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघ हा सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक प्रकारचे वाद विवाद समोर येत आहेत. त्याचबरोबर मोहम्मद आमिर या वेगवान गोलंदाजाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या गचाळ व्ययस्थापनामुळे निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानच्या प्रशिक्षकांना भारताचे महान खेळाडू राहुल द्रविड यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तान संघ कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. यापूर्वी पाकिस्तान संघाच्या मॅनेजमेंटवर गंभीर आरोप करत मोहम्मद आमिर या वेगवान गोलंदाजांने तडकाफडकी निवृत्ती स्विकारली होती. त्यानंतर पुन्हा पाकिस्तान क्रिकेट संघ चर्चेत आला, कारण पाकिस्तान क्रिकेट निवडसमितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केलेल्या संघावर माजी खेळाडू इंजमाम उल हकने प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आता पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफ आणि युनूस खान या माजी खेळाडूंना माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने घरचा आहेर दिला आहे. या दोन माजी खेळाडूंना शाहिद आफ्रिदीने भारतीय खेळाडू राहुल द्रविड यांच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.
माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने राहुल द्रविड यांचे उदाहरण देताना म्हणाल, “महान खेळाडू राहिलेले द्रविड 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना कोचिंग देत आहेत. या वयातचं क्रिकेटपटू घडत असतात. त्यामुळे पाकिस्तानचे माजी खेळाडू इंजमाम उल हक, मोहम्मद युसूफ आणि युनूस खान यांनी 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील आणि 19 वर्षांखालील पातळीवर मोर्चा वळवायला पाहिजे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कोचिंग काही फायदा नाही. ”
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान संघाने आपल्या संघात 9 नवोदित खेळाडूंची निवड केली आहे. पाकिस्तानमध्ये नवोदित खेळाडूंची इतकी कमतरता निर्माण झाली आहे असे वाटते. कारण त्यांनी 36 वर्षीय तबिश खानला पहिल्यांदा कसोटी खेळण्यासाठी निवडले आहे. इंजमाम, मिसबाह, युनूस खान, सईद अजमल आणि शाहिद आफ्रिदी या सारखे खेळाडू निवृत्त झाल्यानंतर अजून ही त्यांच्या जागी नवीन खेळाडू सापडले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानचे माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने माजी खेळाडूंना सल्ला दिला आहे की, त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंना कोचिंग करण्याऐवजी नवीन खेळाडू घडवण्यासाठी लहान मुलांना कोचिंग करायला पाहिजे.
महत्वाच्या बातम्या:
लॉयनविरुद्ध आक्रमक फटका खेळून बाद झाल्यानंतर रोहितचे स्पष्टीकरण, म्हणाला
भरतनाट्यम स्टाइलमध्ये गोलंदाजी कधी पाहिलीय का? हा व्हिडिओ जरुर पाहा
एकविसाव्या वर्षी मुलाचे पदार्पण, तर तेच वय असतांना वडिलांच्या नावे होते हे विक्रम; पाहा आकडेवारी