इंग्लंड आणि श्रीलंका संघात दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉले येथे खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला डाव खेळताना श्रीलंका संघाने सर्वबाद 135 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड संघाने या धावांच्या प्रत्युत्तरादाखल आपला पहिला डाव खेळताना जो रूटने केलेल्या द्विशतकीय खेळीच्या जोरावर सर्वबाद 117.1 षटकांत 421 धावा केल्या आहेत.
इंग्लंड संघाने उभारल्या 421 धावसंख्येत जो रूटचा सिंहाचा वाटा आहे. त्याने आपल्या कारकिर्दीतील चौथे द्विशतक ठोकत आपल्या संघाला भला मोठा धावांचा डोंगर उभा केला. ज्यामध्ये त्याने 321 चेंडूचा सामना करताना 18 चौकार आणि 1 षटकार ठोकत दमदार 228 धावांची खेळी साकारली. त्यामुळे इंग्लंड संघाला पहिल्याच डावात भली मोठी आघाडी घेता आली. त्याचबरोबर डॅनियलने 150 चेंडूचा सामना करताना करताना 6 चौकार आणि 1 षटकार ठोकत 73 धावा केल्या.
त्यामुळे इंग्लंड संघाने पहिल्या डावाच्या जोरावर 286 धावांची आघाडी घेतली आहे. श्रीलंका संघाकडून दिलरूवान परेराने 4 आणि एम्बुलदनियाने 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर श्रीलंका संघाने आपला दुसरा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे श्रीलंका संघाने तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 61 षटके खेळताना 2 गडी गमावून 156 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये कुसल परेराने सलामीला येत 109 चेंडूचा सामना करताना 5 चौकार आणि 1 षटकार ठोकत 62 धावांची खेळी साकारली. तसेच कुसल मेंडीसने 65 चेंडूत 15 धावा केल्या. त्यामुळे आता थिरिमने 189 चेंडूचा सामना करताना 6 चौकारांच्या मदतीने 76 धावांवर खेळत आहे. त्याच्या बरोबर एम्बुलदनिया खेळत आहे. त्याने 5 चेंडूचा सामना करताना अजून खाते सुद्धा उघडेल नाही. इंग्लंड संघाकडून सॅम करन आणि जॅक लिच यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. श्रीलंका संघाला डाव वाचण्यासाठी अजून ही 130 धावांची गरज आहे.
श्रीलंका संघाने पहिल्या डावात 41 षटकांत सर्वबाद 135 धावा केल्या होत्या. यामधे श्रीलंका संघाकडून सर्वाधिक धावा मॅथ्यूज आणि चंडीमल यांनी केल्या होत्या या दोघांनी अनुक्रमे 27 आणि 28 धावांचे संघासाठी योगदान दिले होते . त्याचबरोबर शनाकाने 48 चेंडूचा सामना करताना 3 चौकारांच्या मदतीने 23 धावांची खेळी साकारली होती.
इंग्लंड संघाकडून सर्वाधिक जास्त विकेट्स डॉम बेसने घेतल्या होत्या . त्याने 30 धावा देताना 5 विकेट्स घेतल्या होत्या त्याचबरोबर स्टुअर्ट ब्रॉडने 3 विकेट्स घेताना 20 धावा खर्च केल्या होत्या. तसेच लिचने 17 षटके गोलंदाजी करताना 55 धावा देताना 1 गडी बाद केला होता.
महत्वाच्या बातम्या:
रोहितच्या बेजबाबदार फटक्यावर गावसकरांची टीका, म्हणाले एक वरिष्ठ खेळाडू असून
सोफी डिवाईनच्या मारलेला चेंडू लागला चिमुकलीच्या डोक्याला, मग तिने काय केलं ते पाहाच