जस जसे आयपीएल जवळ येत आहे सर्वच संघांची तयारी जोरात सुरू आहे. त्याचप्रमाणे खेळाडूंचे एकमेकांना आव्हाने देणेही सुरू झाले आहे.
भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने ही विराट कोहली आणि एमएस धोनी यांना असेच आव्हान दिले आहे.
” या आयपीएल मध्ये ह्या दोघांची विकेट्स घेणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. हे दोन्ही खेळाडू फिरकी गोलंदाजी उत्तम खेळतात. त्यामुळे त्यांची विकेट घेणे अवघड आहे. परंतू मला विश्वास आहे की मी त्यांना बाद करु शकतो.”, असे यादवने म्हटले.
गेल्याच महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात कुलदीप यादवने 6 वन-डे सामन्यात 17 विकेट्स घेतल्या होत्या. म्हणूनच कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला 5 कोटीमध्ये आपल्या संघात सामील केले आहे.
या 23 वर्षाच्या गोलंदाजाने मागील आयपीएलच्या दोन सत्रात 15 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या होत्या.