पुणे | आयपीएलचे दोन सामने पुणे शहरात होणार असुन त्यात eliminator आणि Qualifier 2 या सामन्यांचा समावेश आहे. आयपीएल प्रशासन समितीने याबद्दल काल उशीरा रात्री निर्णय घेतला.
हे सामने पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशियशनच्या मैदानावर होणार आहे. eliminatorचा सामना २३ मे रोजी तर Qualifier 2 चा सामना २५ मे रोजी होणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोशियशनचे अध्यक्ष अभय आपटे यांनी आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांना याबद्दल अधिकृत पत्र लिहून विनंती केली होती.
आयपीएलच्या नियमाप्रमाणे जो संघ गतवर्षीचा उपविजेता असतो त्या संघाच्या घरच्या मैदानवर eliminator आणि Qualifier 2 हे सामने होतात. पुणे गेल्या वर्षी या स्पर्धेचे उपविजेते होते. या वर्षी जरी पुण्याचा संघ आयपीएलमध्ये नसला तरीही या नियमामुळे शहराला ही संधी मिळाली आहे.