बंगळुरू। आज आयपीएल २०१८चा ११ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होणार आहे. या सामन्यात बंगलोरने नाणेफेक जिंकून क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज दोन्ही संघ त्यांचा या मोसमातील दुसरा विजय मिळवण्यास उत्सुक असतील. या दोन्ही संघांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे.
आज राजस्थानच्या गोलंदाजांसमोर बंगलोरच्या भक्कम फलंदाजीला रोखण्याचे आव्हान असेल. त्याचप्रमाणे बंगलोरकडे उमेश यादव, युजवेन्द्र चहल, ख्रिस वोक्स सारखे गोलंदाजही आहेत. त्यामुळे राजस्थानला बंगलोरसमोर मजबूत आव्हान ठेवावे लागेल.
त्याचबरोबर राजस्थानचे बेन स्टोक्स, जयदेव उनाडकट, अजिंक्य राहणे यांच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे. राजस्थानच्या फलंदाजीची जबाबदारी संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, जोस बटलर यांच्यावरही असणार आहे. तसेच बंगलोरच्या फलंदाजीला वेसण घालण्यासाठी उनाडकट, धवल कुलकर्णी, बेन लाफ्लिन आणि श्रेयश गोपाळला चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत.
असे आहेत ११ जणांचे संघ:
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस वोक्स, ब्रेंडन मॅक्युलम, क्विंटॉन डी कॉक, उमेश यादव, युजवेंद्र चहल, कुलवंत खजुरिलिया, मंदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी
राजस्थान रॉयल्स: अजिंक्य राहणे, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, डार्सी शॉर्ट, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, बेन लाफ्लिन, श्रेयश गोपाळ, कृष्णप्पा गॉथम.