---Advertisement---

काय आहे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्याचा इतिहास

On: मंगळवार, मे 22, 2018 5:48 PM
---Advertisement---

मुंबई। आजपासुन आयपीएलच्या प्ले-आॅफला सुरवात होत आहे. आज क्वालिफायर 1 चा सामना गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर असणाऱ्या सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघात होत आहे.

या सामन्याला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरवात होणार आहे.

याआधी हे दोन संघ आयपीएलमध्ये 8 वेळा आमने सामने आले आहेत. या 8 सामन्यांपैकी 6 सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली आहे. तर सनरायझर्स हैद्राबादला 2 वेळाच विजय मिळवण्यात यश आले आहे.

तसेच, यावर्षी झालेल्या साखळी फेरीतील दोन्ही सामन्यात चेन्नईने हैद्राबाद विरुद्ध विजय मिळवला आहे. त्यांनी हैद्राबादला झालेल्या सामन्यात 4 धावांनी आणि पुण्यात झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.

याबरोबरच, वानखेडे स्टेडियमवर हैद्राबादने आत्तापर्यंत खेळलेल्या 5 आयपीएल सामन्यांपैकी 1 सामन्यात विजय तर 4 सामन्यात पराभव पत्करला आहे. तसेच चेन्नईचे वानखेडे स्टेडियमवर एकूण 11 आयपीएल सामने झाले असून त्यांना यातील 5 सामन्यात विजय आणि 6 सामन्यात पराभव पहायला मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीप्रमाणेच हे ३ प्रो-कबड्डी स्टार ५ हंगामात खेळले एकाच संघाकडून

Video: सुपरवुमन हरमनप्रीत कौरने घेतला एबी डेविलियर्सपेक्षाही भारी कॅच

रैनाने आज तुफानी खेळी केली तर या विक्रमासाठी विराटला वर्षभर वाट पहावी लागणार!

-शिखर धवनला हा विक्रम करत धोनीला मागे टाकण्याची संधी

वाचा- वेळा बदलल्या आहेत मग आजचा सामना नक्की आहे तरी किती वाजता?

जर आजचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज पराभूत झाले तर….

जर्सी भारताची असो की चेन्नईची, धोनी विक्रम करताना काही थांबेना!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment