दिल्ली | कर्णधारपद सोडल्यावरही मला दिल्लीकडून खेळायच होत परंतु मला संधी देण्यात आली नसल्याचा आरोप गंभीरने केला आहे.
गंभीरच्या नेत़त्वाखाली दिल्लीने आयपीएल 2018 मध्ये 6 पैकी 5 सामन्यात पराभव पाहिले. केवळ एक विजय मिळवता आला होता.
जेव्हा सातव्या सामन्यात मुंबईकर श्रेयस अय्यर दिल्लीचे नेतृत्व करत होता तेव्हा सामन्यानंतर त्याला विचारण्यात आले की गौतम गंभीरला 11 खेळाडूंमध्ये स्थान का देण्यात आले नाही तेव्हा श्रेयसने म्हटले की गौतम गंभीरच तेव्हा खेळायला इच्छुक नव्हता. त्याने तेव्हा स्वत:ला संघाबाहेर केले होते.
यावर स्वत: गंभीरने आता खुलासा केला आहे. ” मी सगळे सामने खेळायला तयार होतो. मला ते खेळाचे होते. संघ व्यवस्थापणाने दिलेलं स्पष्टीकरण चुकीच आहे. मी कधीही मला खेळायच नाही असं म्हटलो नाही. एकवेळ मला न खेळवायचा संघव्यवस्थापणाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे परंतु मी कधीही स्वत: खेळणार नाही असं म्हटलो नाही.” असे गंभीर म्हणाला.
गंभीरच्या या वक्तव्यानंतर आता मोठी चर्चा होत आहे की नक्की कुणामुळे त्याला संघाबाहेर करण्यात आले. का त्याला बाकी सात सामन्यात संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-१९ पैकी चेन्नईच्या ८ खेळाडूंना आयपीएलमध्ये मिळाला सामनावीर पुरस्कार
–धोनी धोनी हैं ! हा फोटो सांगतो, धोनी का स्पेशल आहे?
–चेन्नई आणि वानखेडेचं खास नातं, जुळून आला खास योगायोग
–एकदा नाही तर तब्बल ११ आयपीएल रैना ठरला विराटला सरस!
–एकदा १०० तर दुसऱ्यांदा ०, या खेळाडूबरोबर आयपीएलमध्ये झाला गजब विक्रम
–कॅप्टन कूल एमएस धोनीचा नाद करायचा नायं !