मुंबई | रिलायन्स जिओने आयपीएलच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांसाठी एका धमाकेदार स्पर्धेची घोषणा केली आहे. विजेत्यांना मुंबईत घर आणि कोट्यवधी रुपये बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.
‘जिओ क्रिकेट प्ले अलाँग’ ही गेम खेळून नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या गेममध्ये एकूण ६० सामने असणार आहेत. ११ भाषांमध्ये ही गेम आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना मुंबई शहरात घर आणि २५ कार तसेच कोट्यवधी रुपये रोख जिंकण्याचीही संधी आहे.
या योजनेची घोषणा बुधवारी कंपनीकडून करण्यात आली.
यासोबतच जिओने क्रिकेट सिझन पॅक आणलाय. ५१ दिवसांच्या या पॅकमध्ये सर्व सामन्यांचं स्ट्रीम करता येणार आहे. या पॅकमध्ये २५१ रूपयांत १०२ जीबी डाटासुद्धा मिळणार आहे.
जिओ आयपीएलमध्ये अनेक संघांचे स्पाॅन्सर आहे.