---Advertisement---

आयपीएल २०१९: आज पंजाबकडून पदार्पण केलेला कोण आहे वरुण चक्रवर्ती…

On: बुधवार, मार्च 27, 2019 8:55 PM
---Advertisement---

कोलकता। आज(27 मार्च) आयपीएल 2019 चा सहावा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होत आहे. या सामन्यातून पंजाब संघातील वरुण चक्रवर्ती हा खेळाडू आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.

चक्रवर्ती हा यावर्षीच्या आयपीएल लिलावात जयदेव उनाडकट बरोबरच सर्वात महागडा ठरलेला खेळाडू आहे. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 8.40 कोटींची बोली लावून संघात सामील करुन घेतले आहे. वरुणला संघात घेण्यासाठी या लिलावात पंजाबसह दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स अशा सर्वांनीच प्रयत्न केले होते.

वयाच्या 13 व्या वर्षी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून क्रिकेटला सुरुवात केलेल्या वरुणने नंतर आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला. त्याने चेन्नईमधील एसआरएम विद्यापीठातून पाचवर्षांची आर्किटेक्चरची पदवी घेतली.

पण क्रिकेटच्या प्रेमापोटी त्याने आर्किटेक्चर फर्ममधील नोकरी सोडत पुन्हा क्रिकेटकडे आपला मोर्चा वळवला. तो क्रोमबेस्ट क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला. पण त्यानंतर त्याला घुडघ्याची दुखापत झाली. त्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजी करणे पसंत केले.

27 वर्षीय वरुण तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये(टीएनपीएल) केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सर्वांच्या समोर आला होता. त्याने या स्पर्धेत 9 विकेट्स घेतल्या होत्या. वरुणने मागीलवर्षी रणजी ट्रॉफीमध्येही पदार्पण केले आहे. त्याने हैद्राबाद विरुद्ध रणजी सामना खेळताना 1 विकेट घेतली होती.

तसेच त्याने अ दर्जाचे 9 सामने खेळले असून यात त्याने 22 विकेट्स घेतल्या आहेत. या सर्व विकेट्स त्याने मागीलवर्षीच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत घेतल्या होत्या. तसेच तो मागीलवर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला होता.

विषेश म्हणजे वरुणने चेन्नई सुपर किंग्जच्या आणि कोलकता नाईट रायडर्स संघाच्या नेटमध्ये गोलंदाजीही केली आहे. कोलकताच्या नेटमध्ये गोलंदाजी करत असताना त्याला सुनील नारायण, कुलदीप यादव या गोलंदाजांचा सहवास मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या – 

–जिंकल्यानंतर चेन्नईने असा साजरा केला केदार जाधवचा वाढदिवस

–दोन-तीन वर्षात भारतीय संघात हा खेळाडू करणार पदार्पण

–भर मैदानात इशांत, रबाडाचे वाॅटसनबरोबर झाले वाद, या खेळाडूने केली मध्यस्थी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment