१. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) नंतर लंका प्रीमियर लीग (एलपीएल) 14 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान श्रीलंकेत होईल. इनोव्हेटिव्ह प्रॉडक्शन ग्रुपचे प्रमुख अनिल मोहन यांनी या लीगमध्ये मुनाफ आणि प्रवीण कुमार खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या टी -20 लीगमध्ये एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत, ज्यात कोलंबो, कॅन्डी, गॉल, डंबुल्ला आणि जाफना यांचे संघ असतील. हे दोन्ही माजी वेगवान गोलंदाज निवृत्त झाले आहेत आणि बीसीसीआय अंतर्गत कोणतीही स्पर्धा खेळत नाहीत.
२. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 19 धावांनी पराभूत केले आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 294 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 9 बाद 275 धावाच करू शकला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवुडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
३. आकाशातील वीज अंगावर पडल्याने मोहम्मद नदीम आणि मिझानपूर या दोन उदयोन्मुख क्रिकेटपटूंचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे प्रकरण बांगलादेशमध्ये घडले आहे, जेथे पावसाळ्यात नेहमी वीज कोसळते. पावसामुळे गाझीपूर स्टेडियमवर सुरू असलेले प्रशिक्षण थांबविण्यात आले होते. आणि त्यावेळी मोहम्मद नदीम आणि मिझानपूर या क्रिकेटपटूंनी फुटबॉल खेळण्यास सुरवात केली, तेव्हा आकाशातील वीज त्यांच्यावर पडली.
४. पाकिस्तानचा संघ वर्षाच्या अखेरीस होत असलेल्या न्यूझीलंड दौर्याची तयारी करत आहे. या दौर्यावर पाकिस्तान क्रिकेट संघ चार संघांच्या बरोबरीच्या खेळाडूंसह दौरा करू शकतो. म्हणजेच पाकिस्तान बोर्ड 40 ते 45 खेळाडूंना न्यूझीलंड दौर्यावर पाठवू शकतो. असे झाल्यास, इतिहासात प्रथमच असे होईल की जेव्हा एखादा संघ अशा मोठ्या संघासह द्विपक्षीय मालिकेच्या परदेश दौर्यावर जाईल.
५. अंबाती रायुडू चेन्नई सुपर किंग्जसाठी रैनाऐवजी तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करणारा आदर्श क्रिकेटपटू असल्याचे मत न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिसने व्यक्त केले आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी रैनाने वैयक्तिक कारणे सांगून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.
६. यूएईत चेन्नई सुपर किंग्ज संघ सराव करत आहे. यादरम्यान धोनीने ठोकलेल्या षटकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून मुरली विजय आश्चर्यचकित झाला आहे. व्हिडिओ बनवत असलेले टीम मॅनेजर रसेलला तो म्हणाला, “रसेल ही शक्ती आहे. उत्तम टायमिंग, बॅट स्पीड आणि उत्तम स्विंग जे की त्याला एक गिफ्ट मिळाले आहे. यापेक्षा चांगले असू शकत नाही. गोलंदाजांना वाईट वाटत असेल.”
७. किंग्ज इलेव्हन पंजाबने 19 वर्षाखालील विश्वचषकातील रवी बिश्नोई या स्टार गोलंदाजला दोन कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे. रवीला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्यासाठी मुरुगन अश्विनशी स्पर्धा करावी लागेल. दोन वर्षांपूर्वी रवी बिश्नोईने राजस्थानकडून खेळताना कूच बिहार ट्रॉफीमध्ये 47 विकेट घेतल्या होत्या. सोबतच विनू मांकड ट्रॉफीमध्ये त्याने 22 विकेट घेऊन निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. या कामगिरीमुळे रवीला 19 वर्षांखालील भारतीय संघात स्थान देण्यात आले.
८. आयपीएल २०२० स्पर्धेला सुरुवात होण्यापुर्वीच माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट लीने यावर्षीच्या आयपीएल विजेत्या संघाची भविष्यवाणी केली आहे. त्याने म्हटले की, “आताच आयपीएल २०२०च्या विजेत्या संघाची भविष्यवाणी करणे खूप अवघड आहे, पण मला वाटते की धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघ यंदा विजेता ठरू शकतो,”
९. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा उपकर्णधार सुरेश रैना आयपीएल २०२०मधून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी संघात इंग्लंडचा स्टार टी२० फलंदाज डेव्हिड मलानला सामील करण्यात येईल असे म्हटले जात होते. परंतु सीएसकेचे सीईओ यांनी स्पष्ट केले आहे की, मलानला रैनाच्या जागी संघात स्थान देण्यात येणार नाही. याचे कारण सांगताना ते म्हणाले, “आधीच संघात परदेशी खेळाडूंची भरमार आहे. अशा परिस्थितीत आम्ही दूसऱ्या कोणत्या परदेशी खेळाडूला संघात सामील करु शकत नाही.”
१०. आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स संघाच्या चिंतेत भर पडली आहे. स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथला इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्याआधी सराव करताना एक चेंडू डोक्यावर आदळल्याने दुखापत झाली आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पुढील २ सामन्यांसाठी स्मिथ उपलब्ध असेल की नाही हे त्यांनी सांगितले नाही. जर स्मिथ स्पर्धेतून बाहेर पडला, तर तो राजस्थानसाठी मोठा धक्का ठरेल, कारण तो संघाचा कर्णधारही आहे.