---Advertisement---

कोरोनाने अवघड केलंय! बीसीसीआयच्या नुकसानीचा आकडा लईच मोठा

On: शुक्रवार, मार्च 13, 2020 7:46 PM
---Advertisement---

सध्या कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे बरेच सामने रद्द करण्यात आले, तर काही सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसचा फटका येत्या आयपीएललाही बसला आहे. 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या 13व्या हंगामाला 2 आठवड्यांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे 15 एप्रिलपासून आयपीलची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

यादरम्यानही जर कोरोनाचा प्रभाव कमी झाला नाही तर आयपीएल रद्द होण्याचीही शक्यता आहे. मात्र, यामुळे बीसीसीआयला खूप मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल.

आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला अंदाजे १० हजार करोड रुपयांचे नुकसान होऊ शकते. खेळ तज्ञांच्या म्हणण्यानुसार, आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला होणारे नुकसान खूप मोठे असेल. ही रक्कम १० हजार करोड रुपयांपर्यंत जाऊ शकते.

याव्यतिरिक्त आयपीएल गवर्निंग कांउसिलसाठीची स्पॉन्सरशिप, मीडिया राइट्स आणि फ्रंचायझी रिव्हेन्यू यामुळेही मोठे नुकसान झेलावे लागू शकते.

विशेषत: या सर्व नुकसानाची भरपाई बीसीसीआयला आणि आयोजकांना करावी लागणार आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

‘या’ संघाचा कर्णधारच आयपीएलमधून बाहेर जाण्याची शक्यता!

मुंबईपाठोपाठ या दोन संघांनी जिंकले आहेत सर्वाधिक रणजी करंडक

फलंदाजासहित प्रेक्षकही हादरले, गोलंदाजाने केले असे काही…

चाहत्यांशिवाय स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणं सोप्प नाही

तिच्या एका ट्विटने पुरुष क्रिकेटपटूंना जमीनीवर आणले…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---