fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये दिसणार नव्या भूमिकेत

September 18, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


मुंबई । दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जेपी ड्यूमिनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 मध्ये समालोचकांच्या भूमिकेत दिसणार आहे. तो त्याच्या नव्या भूमिकेसाठी उत्सुक आहे. आयपीएल 2020 चे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने एक कॉमेंट्री पॅनेल जाहीर केले आहे, ज्यात जगभरातील काही सर्वोत्कृष्ट आणि नामांकित क्रिकेट तज्ज्ञांचा समावेश आहे.

बर्‍याच माजी स्टार खेळाडूंनी सुसज्ज असलेले हे कॉमेंट्री  पॅनल समालोचन सांगण्याव्यतिरिक्त सामन्यांचे विश्लेषण करतील. आयपीएलचा उद्घाटन सामना 19 सप्टेंबरला अबू धाबी येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या समालोचन पॅनेलमध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघांचा समावेश आहे.

ड्युमिनीने स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “आयपीएल क्रिकेट लीगला शिखर म्हणून पाहिले गेले आहे, जिथे या सर्वात मोठ्या टप्प्यावर क्रिकेट स्टार जमतात. आयपीएलमधून समालोचन जगात पदार्पण केल्याचा मला आनंद झाला आहे. मला आशा आहे की, माझे अनुभव आणि खेळातील बारकावे प्रेक्षकांना आणि चाहत्यांना सामन्यांचे विश्लेषण करण्यास आणि खेळांचा आनंद घेण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.”

तो पुढे म्हणाला, “मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सलामीच्या सामन्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, कारण मला आशा आहे की, दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळेल. मला खात्री आहे की जगभरातील चाहते धोनीला मैदानात परत येताना पाहण्यास उत्सुक असतील.”

त्याचबरोबर माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ही स्पर्धा कोट्यावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक उर्जा निर्माण करेल अशी आशा व्यक्त केली आहे. गावस्कर यांनी आयपीएल 2020 मध्ये समालोचक म्हणून समाविष्ट केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, “मला आशा आहे की, ही स्पर्धा लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकेल. बर्‍याच तज्ञांनी सुसज्ज असलेल्या कॉमेंट्री पॅनेलचा भाग होण्यासाठी मला खूप आनंद झाला आहे आणि मी पण या स्पर्धेची क्रीडाप्रेमींसोबत उत्सुकतेने वाट पाहत आहे.”

ते म्हणाले, “आयपीएल हे युवा प्रतिभेला संधी देण्याचे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ ठरले आहे. मला आशा आहे की, यावर्षीदेखील असेच काही दिसेल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील उद्घाटन सामन्याकडे सर्वांचे लक्ष असेल. आम्ही धोनीला एक वर्षानंतर खेळताना पाहू आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण त्याला पाहण्यासाठी उत्सुक असेल.”

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जेपी ड्यूमिनी कॉमेंट्रीच्या जगात पदार्पण करेल. या पॅनेलमध्ये  हर्षा भोगले, मार्क निकोलस, सायमन डूल, इयान बिशप आणि सुनील गावस्कर या तज्ञांचा समावेश आहे.

या पॅनेलमध्ये मायकेल स्लेटर, डॅनी मॉरिसन, दीप दासगुप्ता, रोहन गावस्कर, पम्मी मबंगवा, डॅरेन गंगा, एल. शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक, केविन पीटरसन आणि कुमार संगकारा यांचाही समावेश आहे. अंजुम चोप्रा आणि लिसा स्थाळेकर हे महिला समालोचक म्हणून योगदान देतील.


Previous Post

जोफ्रा आर्चरची ‘ती’ चूक इंग्लंडला पडली भलतीच महागात

Next Post

मुंबई इंडियन्स संघात फिनिशरची भूमिका कोण निभवणार? प्रशिक्षकाने दिले उत्तर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ IPL

मुंबई इंडियन्स संघात फिनिशरची भूमिका कोण निभवणार? प्रशिक्षकाने दिले उत्तर

Photo Courtesy: Twitter/RCBTweets

अयोग्य खेळाडूंना सपोर्ट करत होता विराट; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा

Photo Courtesy: Twitter/ HomeOfCricket

ऐकावे ते अजबच! संघमालक खेळाडू बनून मैदानात उतरला आणि...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.