चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२०मध्ये अतिशय खराब कामगिरी केली. साखळी फेरीत संघ ७व्या स्थानावर फेकला गेला. संघातील सर्वच खेळाडू या खराब कामगिरीसाठी जबाबदार होते. तरीही कर्णधार धोनीचे अपयश हे डोळ्यात भरणारे होते. याचमुळे धोनीची एक धाव संघाला जवळपास ७ लाख ५० हजारांना पडली. कसे ते या लेखात पाहू.
धोनीने आयपीएल २०२०मध्ये १४ सामन्यात १२ डावांत केवळ २५च्या सरासरीने २०० धावा केल्या. त्यात त्याने १६ चौकार व ६ षटकार मारले. १७२ चेंडूंचा सामना केलेल्या धोनीचा स्ट्राईक रेटही लौकीकास साजेसा राहिला नव्हता. त्याने जेमतेम ११६.२७च्या सरासरीने धावा केल्या.
एमएस धोनीला संघात कायम ठेवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जने २०२०च्या हंगामासाठी तब्बल १५ कोटी रुपये मोजले होते. सामन्याचे मानधन व भत्ता हे यात वेगळं असतं. परंतू धोनीने या हंगामात केवळ २०० धावा केल्यामुळे त्याची एक धाव जवळपास ७ लाख ५० हजार रुपयांना सीएसकेला पडली आहे.
आयपीएलच्या या हंगामात असे अनेक खेळाडू खेळले, ज्यांना संघांनी केवळ २० लाख रुपयांत आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. परंतू त्यांनीही यावेळी धोनीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
धोनीप्रमाणेच या हंगामात पॅट कमिन्सची एक विकेट १ कोटी २९ लाखांना पडली आहे. त्याला कोलकाताने १५ कोटी ५० लाख रुपये मोजत संघात घेतले होते. परंतू त्याने केवळ १२ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या बाजूला मॅक्सवेलची एक धाव जवळपास १० लाख रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला पडली आहे.
१० कोटी रुपयांना संघात घेतलेल्या ख्रिस मॉरीसची एक विकेट बेंगलोर संघाला ९० लाखांच्या पुढे गेली आहे. दुसऱ्या बाजूला शेल्डन कॉट्रेलची एक विकेट पंजाबला १ कोटी ४१ लाखांना पडली आहे . त्याला पंजाबने तब्बल ८ कोटी ५० लाख रुपये मोजले होते. परंतू त्याने ६ सामन्यात केवळ ६ विकेट्स घेतल्या.
वाचा
–कहर! आयपीएल २०२०मध्ये त्याची एक धाव संघाला पडली तब्बल १० लाखांना
–काय सांगता.! एका गुलीगत विकेटसाठी त्याने आयपीएलमध्ये घेतलेत तब्बल ७५ लाख