आयपीएलच्या १३ व्या हंगामाला आजपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना मागील वर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघात आबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून सीएसकेने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यादरम्यान सीएसकेच्या फाफ डू प्लेसिसने शानदार झेल घेतले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६२ धावा केल्या आहेत. मुंबईकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉकने डावाची सुरुवात केली. संघाने रोहित (१२) आणि डी कॉकच्या (३३) रूपात संघाने आपले २ विकेट्स ५० धावांच्या आत गमावले. सूर्यकुमार यादव हा तिसऱ्या विकेटच्या रूपात बाद झाला.
एका बाजूने मुंबईचा डाव पुढे नेणाऱ्या सौरभ तिवारीचा (४२) झेल रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर आणि १४.१ व्या षटकात डू प्लेसिसने घेतला. त्याचसोबत जडेजाच्या षटकाच्या ५व्या चेंडूवर त्याने पुढे फलंदाजीस आलेल्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यालाही झेलबाद केले. डू प्लेसिसने घेतलेले हे दोन्ही झेल उल्लेखनीय होते. याव्यतिरिक्त त्याने जेम्स पॅटिन्सलाही झेलबाद केले आहे. अशाप्रकारे त्याने एकूण ३ झेल घेतले.
Honestly, not sure if this was the first laddoo or second laddoo…but laddoo laddoo dhaan! 🙈 #Fafulous'ly brought us back into the game! 😍🦁💛 #WhistleFromHome #WhistlePodu #Yellove #MIvCSK pic.twitter.com/z4SdH3Teqc
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 19, 2020
सीएसकेकडून गोलंदाजी करताना लुंगी एन्गिडीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. सोबतच दीपक चाहर आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर पीयुष चावला आणि सॅम करनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
🤭🤭🤭🤫🤫🤫🤫🤫 King du plessis second time pic.twitter.com/4mvpIyC88G
— ALI_007🗨️ (@Ali89430780) September 19, 2020
मुंबई इंडियन्स संघाने दिलेले १६३ धावांचे आव्हान सीएसके संघ पूर्ण करतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-भल्या भल्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या गोलंदाजाने केलाय नकोसा विक्रम, ठरलाय एकमेव गोलंदाज
-नाणेफेक जिंकून सीएसकेची फिल्डिंग; या अष्टपैलू खेळाडूला नाही मिळाली जागा
-जगातला सर्वोत्तम अष्टपैलू आहे धोनीच्या ताफ्यात; पाचशे बळीसह काढल्या आहेत ६५०० धावा
ट्रेंडिंग लेख-
-युवराजशी फ्लिंटॉफने पंगा घेतला, पण ब्रॉडने किंमत चुकवली
-८ आयपीएल संघांमध्ये एक एक तरी कमतरता आहेच, पहा कुणाकडे काय नाही
-मुंबई इंडियन्सच्या फिरकी आक्रमणाचा नवा स्तंभ