---Advertisement---

आयपीएलमध्ये फ्लॉप ठरलेल्या भीडूंची प्लेइंग इलेव्हन, धोनीला कर्णधारपद तर यष्टीरक्षक…

On: शुक्रवार, नोव्हेंबर 6, 2020 7:28 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्ले ऑफमधील दोन व अंतिम फेरीचा एक असे केवळ तीन सामने बाकी आहेत. हा हंगाम अनेक खेळाडूंसाठी चांगला ठरला असताना काही खेळाडूंसाठी मात्र खूपच खराब राहिला. त्यात अनेक अनुभवी खेळाडूंबरोबर युवा खेळाडूंचाही समावेश आहे. प्रत्येक वेळी आयपीएलची प्ले ऑफ फेरी खेळणारी सीएसके स्पर्धेतून बाहेर जाणारा पहिला संघ ठरला. तर त्यातील अनेक खेळाडूही स्पर्धेत फ्लॉप ठरले. आयपीएल साखळी फेरीत अपयशी ठरलेल्या खेळाडूंचा ही प्लेइंग इलेव्हन-

शेन वॉटसन
आयपीएल २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर व चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर शेन वॉट्सन अपयशी ठरला. याचाच परिणाम म्हणजे संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यावर त्याने निवृत्तीची घोषणा केली. या हंगामात ११ सामन्यात तो केवळ २९९ धावा करु शकला.
आहेत.

पृथ्वी शॉ
तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये एक प्रतिभावान क्रिकेटर म्हणून ओळख असलेल्या पृथ्वी शॉसाठीदेखील ही आयपीएल निराशाजनक ठरली. दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीला खेळणाऱ्या शॉने १२ सामन्यात केवळ २२८ धावा केल्या. कहर म्हणजे गेल्या ६ सामन्यात त्याला केवळ ३० धावा करता आल्या

करुण नायर
विरेंद्र सेहवागपाठोपाठ भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा करुण नायरही या आयपीएलमध्ये अपयशी ठरला. एकतर करुणला संघात संधीच कमी वेळा मिळाली. तसेच जेव्हा जेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला संधी दिली, तेव्हा त्याला त्याचे सोने करता आले नाही. त्याने ४ सामन्यात केवळ १६ धावा केल्या.

कर्णधार व यष्टीरक्षक एमएस धोनी
चेन्नई सुपर किंग्जला ३ वेळा विजयी करणारा संघाचा महान कर्णधार एमएस धोनीही या आयपीएलमध्ये अपयशी ठरला. अतिशय संथगतीने त्याने फलंदाजी करत संघाला अडचणीत आणले. १२ सामन्यात ११६ च्या स्ट्राईक रेटने त्याने या हंगामात केवळ २०० धावा केल्या. अनेक सामन्यात नाबाद राहत असूनही त्याला संघाला विजयी करण्यात अपयश आले.

दिनेश कार्तिक
कर्णधार असताना फलंदाजी करताना दबाव येत असल्याचे कारण देत स्पर्धेच्या अर्ध्यात दिनेश कार्तिकने कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद सोडले. परंतू त्यानंतरही त्याच्या फलंदाजीत कोणतीही विशेष गोष्ट दिसली नाही. धोनीपुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्य़ा या खेळाडूला आयपीएल २०२० धोनीप्रमाणेच खराब राहिली. १४ सामन्यात त्याने १४.०८च्या सरासरीने केवळ १६९ धावा केल्या.

आंद्रे रसेल
अतिशय स्फोटक फलंदाज व तितकाच उपयुक्त गोलंदाज अशी ओळख असलेल्या आंद्रे रसेलला ही आयपीएल एका वाईट स्वप्नासारखी राहिली. त्याने १० सामन्यात केवळ १३च्या सरासरीने ११७ धावा केल्या. यावेळी हा मोठा खेळाडू दुखापत व फॉर्म अशा दोन्ही गोष्टींशी झगडताना दिसला.

केदार जाधव
चेन्नई सुपर किंग्जचा ३५ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवसाठीही हा हंगाम काही विशेष ठरला नाही. ८ सामन्यात २०च्या सरासरीने त्याने केवळ ६२ धावा केल्या. विशेष म्हणजे केदार ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो ती स्फोटक फलंदाजीही या हंगामात दिसली नाही. त्याने केवळ ९३.९३च्या स्ट्राईक रेटने ६६ चेंडूत ६२ धावा केल्या.

सुनिल नारायण
आयपीएलमधील एक कायम चर्चत राहणार नाव म्हणजे सुनिल नारायण. परंतू यावेळी ना ही चर्चा झाली ना कामगिरी. १० सामन्यात जेमतेम १३.४४च्या सरासरीने त्याने १२१ धावा केल्या तर गोलंदाजीत ५ विकेट्स त्याने घेतल्या.

कुलदीप यादव
भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने ५ सामन्यात केवळ १ विकेट घेतली. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. त्याच्याच खांद्याला खांदा लावून भारतीय संघातून गोलंदाजी करणाऱ्या युझवेंद्र चहने मात्र बेंगलोरकडून तब्बल २० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

जयदेव उनाडकट
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज व यावर्षीच्या रणजी स्पर्धेचा स्टार जयदेव उनाडकट आयपीएल २०२० मध्ये सपशेल फ्लॉफ ठरला. ७ सामन्यात अतिशय खराब ५७च्या सरासरीने त्याने केवळ ४ विकेट्स घेतल्या. त्याची एक विकेट देखील राजस्थानला काही लाख रुपयांत पडली आहे.

डेल स्टेन
आयपीएल २०२०मधील आणखी एक मोठे व चर्चेतील नाव म्हणजे डेल स्टेन. स्टेनने आय़पीएलचा सराव खूप आधी सुरु केला होता. संघातील युवा गोलंदाजांना त्याने बहुमूल्य असे मार्गदर्शनही केले. परंतू त्याला त्याच्या गोलंदाजीत ही चमक दाखवता आली नाही. ३ सामन्यात १३३ च्य़ा सरासरीने त्याने केवळ एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

-“रिषभ पंत कधीही धोनी होऊ शकत नाही”, पाहा कोण म्हणतंय

-ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती

-ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत

-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---