शुक्रवारी (९ ऑक्टोबर) शारजाह येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १८४ धावा केल्या आहेत. यावेळी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर धावबाद झाला.
श्रेयस सामन्याच्या ६ व्या षटकात धावबाद झाला. अँड्र्यू टायने टाकलेल्या या षटकातील ५ व्या चेंडूवर त्याने कव्हर्सच्या दिशेने फटका मारला आणि तो एकेरी धाव काढायला गेला. पण श्रेयसचा साथीदार असलेल्या रिषभ पंतने धाव घेण्यास नकार दिला. तसेच तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या यशस्वी जैयस्वालने चपळाईने तो चेंडू पकडला. ते पाहून श्रेयस माघारी फिरला होता. पण जैयस्वालने लगेचच स्ट्रायकर एन्ड्सच्या दिशेने चेंडू फेकला, तो चेंडू श्रेयस क्रिजमध्ये पोहचण्याआधी थेट स्टंपला लागला. त्यामुळे श्रेयसला विकेट गमवावी लागली.
विशेष म्हणजे श्रेयसची आयपीएलमध्ये धावबाद होण्याती ही चौथी वेळ होती आणि त्यातील तीन वेळा त्याचा फलंदाजी साथीदार रिषभ पंत होता.
श्रेयसने या सामन्यात १८ चेंडूत २२ धावा केल्या. अय्यर बाद झाल्यानंतर काही वेळातच पंतही धावबादच झाला. पंतने यावेळी ५ धावाच केल्या. याव्यतिरिक्त दिल्लीकडून शिमरॉन हेटमायरने २४ चेंडूत सर्वाधिक ४५ धावा केल्या. तर मार्कस स्टॉयनिसने ३९ धावा केल्या. या व्यतिरिक्त अक्षर पटेल(१७), हर्षल पटेल(१६) आणि पृथ्वी शॉ (१९) यांनाच दोनआकडी धावसंख्या पार करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्जेटिनाने चारली इक्वेडोरला धूळ; मेस्सीने केला निर्णायक गोल
अविश्वसनीय! थेट गोलंदाजानेच १०० मीटरपर्यंत धाव घेत पकडला झेल, व्हिडिओ होतोय व्हायरल
आयपीएल २०२०: ‘या’ खेळाडूच्या खराब फॉर्ममुळे ट्रोल झाली पत्नी; मग काय दिले सडेतोड प्रत्युत्तर
ट्रेंडिंग लेख-
हैदराबादने एकहाती जिंकला सामना; जाणून घ्या पंजाबच्या पराभवाची ५ कारणे
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला