शनिवारी इंडियन प्रीमियर लीग 2020 च्या मोसमातील साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या मोसमातील पहिला सामना 19 सप्टेंबर ला गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अबुधाबी मध्ये रंगणार आहे.
यावर्षीच्या आयपीएलच्या 13 व्या मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचे नेतृत्व युवा फलंदाज केएल राहुल करणार आहे. पंजाबने आत्तापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवलेले नाही. त्यामुळे ते यावर्षी आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकण्यास उत्सुक असतील. तसेच यावर्षी पंजाबचा संघाला दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचे मार्गदर्शन मिळणार आहे. कुंबळे पंजाब संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
तसेच पंजाबच्या साखळी फेरीतील 14 सामन्यांपैकी 11 सामने रात्री 7.30 वाजता होतील. तर उर्वरित 3 सामने दुपारी 3.30 वाजता सुरु होईल.
आयपीएलचा हा 13 वा मोसम यावर्षी 53 दिवसांचा असणार आहे. 19 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत या आयपीएल मोसमातील साखळी सामने पार पडतील. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होतील प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही.
तसेच यावर्षी आयपीएलमध्ये 10 डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने 3.30 वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरु होतील.
असे आहे आयपीएल 2020मधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक –
२० सप्टेंबर,रविवार: दिल्ली विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२४ सप्टेंबर, गुरुवार: पंजाब विरुद्ध बेंगलोर, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२७ सप्टेंबर, रविवार: राजस्थान विरुद्ध पंजाब, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१ ऑक्टोबर: गुरुवार: पंजाब विरुद्ध मुंबई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
४ ऑक्टोबर: रविवार: पंजाब विरुद्ध चेन्नई, शारजहा, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
८ ऑक्टोबर: गुरुवार: हैद्राबाद विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१० ऑक्टोबर: शनिवार: पंजाब विरुद्ध कोलकाता, आबुधाबी, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१५ ऑक्टोबर: मंगळवार: बेंगलोर विरुद्ध पंजाब, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१८ ऑक्टोबर: शुक्रवार: मुंबई विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२० ऑक्टोबर: शनिवार: पंजाब विरुद्ध दिल्ली, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२४ ऑक्टोबर: सोमवार: पंजाब विरुद्ध हैद्राबाद , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२६ऑक्टोबर: सोमवार: कोलकाता विरुद्ध पंजाब, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३० ऑक्टोबर: शुक्रवार: पंजाब विरुद्ध कोलकाता, आबुधाबी, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१ नोव्हेंबर: रविवार: चेन्नई विरुद्ध पंजाब, आबुधाबी, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
आयपीएल 2020 साठी असा आहे किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ-
केएल राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मयंक अगरवाल, करुण नायर, सरफराज खान, निकोलस पूरन, मनदीप सिंग, के गॉथम, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अर्शदीप सिंग, हार्दस विल्जोइन, एम अश्विन, जे सुचित, हरप्रीत ब्रार आणि दर्शन नळकंडे, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉट्रेल, रवी बिश्नोई, प्रभसिमरन सिंग, दीपक हुडा, जेम्स निशाम , इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, तजिंदर धिल्लन.