आयपीएल 2020 चे साखळी सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहेत. या हंगामातील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात रंगणार आहे.
यावर्षी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व पुन्हा एकदा स्टीव्ह स्मिथकडे सोपविण्यात आले आहे. त्याने मागीलवर्षी चेंडू छेडछाडीमुळे आलेल्या बंदीचा कालावधी पूर्ण करत आयपीएलमध्ये पुनरागमन केले आहे. तसेच मागीलवर्षी राजस्थानच्या काही सामन्यांचे नेतृत्वही केले. पण यावर्षी त्याच्याकडे पूर्णवेळासाठी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
राजस्थानने आयपीएलच्या सर्वात पहिल्या हंगामाचे 2008ला विजेतेपद जिंकले आहे. त्यानंतर मात्र त्यांना विजेतेपद जिंकता आलेले नाही. त्यांना मागीलवर्षी साखळी फेरीनंतर 7 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्याआधी त्यांनी 2018ला प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
यावर्षीसाठी राजस्थानच्या संघात 25 खेळाडूंचा समावेश आहे. यात स्मिथसह बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जॉस बटलर असे परदेशी तर संजू सॅमसन, रियान पराग, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट असे भारतीय खेळाडू आहेत. त्याचबरोबर 19 वर्षांखालील भारतीय संघातील यशस्वी जयस्वाल, कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग हे स्टार खेळाडू त्यांच्या संघात आहेत.
यावर्षी त्यांचा पहिला सामना 22 सप्टेंबरला 3 वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शारजहा येथे होणार आहे.
असे आहे आयपीएल 2020मधील राजस्थान रॉयल्स संघाच्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक-
२२ सप्टेंबर, मंगळवार: राजस्थान विरुद्ध चेन्नई, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२७ सप्टेंबर, रविवार: राजस्थान विरुद्ध पंजाब, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३० सप्टेंबर, बुधवार: राजस्थान विरुद्ध कोलकाता, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३ ऑक्टोबर: शनिवार: बेंगलोर विरुद्ध राजस्थान, आबुधाबी, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
६ ऑक्टोबर: मंगळवार: मुंबई विरुद्ध राजस्थान, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
९ ऑक्टोबर: शुक्रवार: राजस्थान विरुद्ध दिल्ली, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
११ ऑक्टोबर: शनिवार: राजस्थान विरुद्ध हैद्राबाद , दुबई रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१४ ऑक्टोबर: सोमवार: दिल्ली विरुद्ध राजस्थान, दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१७ ऑक्टोबर: गुरुवार: राजस्थान विरुद्ध बेंगलोर, दुबई , रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१९ ऑक्टोबर: शनिवार: चेन्नई विरुद्ध राजस्थान , आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२५ ऑक्टोबर: सोमवार: राजस्थान विरुद्ध मुंबई, आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१ नोव्हेंबर: रविवार: कोलकाता विरुद्ध राजस्थान, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
आयपीएल 2020 साठी असा आहे राजस्थान रॉयल्सचा संघ-
स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, जोस बटलर, रियान पराग, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, महिपाल लोमरर, वरुण ऍरॉन, मनन वोहरा, मयंक मार्कंडे, राहुल तेवतिया, अंकित राजपूत, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, टॉम करन, अनुज रावत, डेव्हिड मिलर, ओशाण थॉमस, आकाश सिंग, अनिरुद्ध जोशी.