इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबईसाठी उत्तम कामगिरी करणारा श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आयपीएल २०२२ मध्ये खेळाडू नव्हे तर प्रशिक्षकाच्या भुमिकेत दिसणार आहे. राजस्थान राॅयल्स संघाने आयपीएलच्या आगामी हंगामात मलिंगाला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. मुंबई संघासाठी कित्येक वर्ष गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने मागील वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. राजस्थान संघासोबत तो पहिल्यांदा प्रशिक्षक म्हणून दिसणार आहे. आयपीएलपूर्वी तयारी करतानाचा मलिंगाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
राजस्थान राॅयल्सने आगामी हंगामासाठी तयारी सुरु केली आहे. जवळ-जवळ सर्वच खेळाडू आयपीएलसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या हंगामात संघातील अनेक गोलंदाज मलिंगाकडून गोलंदाजी शिकण्याचा प्रयत्न करताना दिसतील. सरावादरम्यानचा मलिंगाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. राजस्थान फ्रॅंचायझीच्या इंस्टाग्राम आकाऊंटवरुन त्याचा गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
फ्रॅंचायझीने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ‘लसिथ मलिंगा, अजूनही त्याच्यातील ती कला जिवंत आहे.’ तसेच फ्रॅंचायझीने राॅयल्स फॅमीली असा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे. या व्हिडीओत त्याने चेंडू टाकला आणि स्टंप उडाल्याचे दिसत आहे. लसिथ मलिंगा सध्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे.
Lasith Malinga, he's still got it! 💗🤩#RoyalsFamily | #TATAIPL2022 | @ninety9sl pic.twitter.com/zvOVCQOsga
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) March 20, 2022
मलिंगाने आयपीएलमध्ये १२२ सामने खेळले असून १७० विकेट्स घेतल्या आहेत. लसिथ मलिंगा आयपीएल इतिहासात पाच वेळा विजेता संघ ठरलेल्या मुंबई इंडियन्सचा भाग राहिला असून त्याने १२२ सामने मुंबईसाठी खेळले आहेत. त्याने मुंबई संघासाठी महत्त्वपुर्ण कामगिरी केली होती. त्याने २२६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३८ विकेट्स घेतल्या आहेत, तर ८४ टी२० सामन्यांमध्ये १०७ विकेट्स घेतल्या आहेत.
राजस्थान राॅयल्स आपला पहिला सामना २९ मार्चला सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध खेळणार आहेत. संघाचे नेतृत्व संजू सॅमसन करताना दिसणार आहे. राजस्थान राॅयल्सने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, जाोस बटलर आणि यशस्वी जायसवाल या खेळाडूंचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरचा कर्णधार असूनही श्रेयस ‘या’ संघनायकाचा आहे मोठा चाहता, कारणासहित सांगितले नाव
षटकारांच्या ‘या’ शानदार विक्रमात सीएसकेचा धोनीच ‘सिक्सर किंग’, विस्फोटक गेल टॉप-५मध्येही नाही
अष्टपैलू म्हणजे विजयाची गॅरंटी! लखनऊ आणि चेन्नईकडे भरमार, पण ‘या’ संघांकडे मर्यादित पर्याय