---Advertisement---

लेगस्पिनर ठरली रोहित शर्मासाठी डोकेदुखी; जाणून घ्या काय आहे कारण

On: रविवार, सप्टेंबर 20, 2020 11:41 AM
---Advertisement---

मुंबई । अखेर बर्‍याच अनिश्चिततेनंतर आयपीएलचा 13 वा हंगाम सुरू झाला. शनिवारी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने होते. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या हंगामातील पहिला चेंडू खेळला आणि चेन्नईचा दीपक चाहरने पहिला चेंडू फेकला. पहिल्याच चेंडूवर रोहितने सणसणीत चौकार ठोकला.

आयपीएल 2020 चा पहिला चौकार

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील पहिला चौकार रोहितच्या नावावर झाला, परंतु रोहितही या आयपीएलमधील बाद होणारा पहिला खेळाडूही ठरला. चेन्नईचा लेगस्पिनर पीयूष चावलाने रोहितला बाद करत या आयपीएलची पहिली विकेट घेतली.  रोहितने 10 चेंडूत 12 धावा केल्या.

लेग स्पिनरच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळा बाद होणारा खेळाडू

2017 च्या आयपीएलनंतर रोहित लेग स्पिनवर सर्वाधिक वेळा बाद होणारा फलंदाजही ठरला. या सामन्यासह रोहित एकूण 9 वेळा लेगस्पिनर गोलंदाजाविरुद्ध बाद झाला आहे. एबी डिव्हिलियर्स आणि रॉबिन उथप्पा हे प्रत्येकी 8-8 वेळा लेगस्पिनच्या गोलंदाजीवर बाद झाले. ते संयुक्तपणे दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

रोहितने ज्या पद्धतीने सामन्याची सुरूवात केली, त्यावरून तो एक मोठा डाव खेळू शकेल असे वाटत होते, पण पियुषने ब्रेक लावत, धोनीच्या संघाला मोठे यश मिळवून दिले.

या सामन्यात मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नईने ५ विकेट्स राखत १९.२ षटकार पूर्ण केले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---