आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने रविवारी (११ ऑक्टोबर) अबू धाबी येथे दिल्ली कॅपिटल्स संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह मुंबईने या हंगामातील आपला पाचवा विजय मिळवला. मुंबईच्या विजयाचा हीरो क्विंटन डी कॉक ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
नाणेफेक जिंकत दिल्ली संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी प्रथम फलंदाजी करत ४ विकेट्स गमावत १६२ धावा केल्या. दिल्ली संघाने दिलेल्या १६३ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्स संघाने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत १६६ धावा करत पूर्ण केले.
मुंबईकडून फलंदाजी करताना डी कॉकने आणि सूर्यकुमार यादवने अर्धशतकी खेळी केल्या. डी कॉकने ३६ चेंडूंचा सामना करत ५३ धावा केल्या. यामध्ये ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. सोबतच सूर्यकुमारने ३२ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने २८ धावांची खेळी केली. या फलंदाजांव्यतिरिक्त इतर कोणालाही २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार रोहित शर्माही केवळ ५ धावा करत झेलबाद झाला.
दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. सोबतच अक्षर पटेल, आर अश्विन आणि मार्कस स्टॉयनिसने प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून शिखर धवनने धडाकेबाज खेळी केली. त्याने ५२ चेंडूत १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ६९ धावांची खेळी केली. त्याच्यासोबतच कर्णधार श्रेयस अय्यरने ४२ धावा केल्या. इतर फलंदाजांना २० धावांचा आकडा पार करता आला नाही.
मुंबई संघाकडून गोलंदाजी करताना फिरकीपटू कृणाल पंड्याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या, तर वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने १ विकेट घेतली.
मुंबई संघाला या विजयासह २ गुण मिळाले. या गुणांचा फायदा घेत पॉईंट टेबलमध्ये मुंबई संघ १० गुणांसह अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-एकेकाळी मॅगी खाऊन ढकलत होता दिवस; आज मनगटावर १ कोटीचं घड्याळ
-व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा
-अखेर मुंबई विरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळाली संधी; पाहा असा आहे ११ जणांचा दिल्ली संघ
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा