आयपीएलचा सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघात जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक एमएस धोनी आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने तीन वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. या संघात धोनीशिवाय शेन वॉटसन, फाफ डू प्लेसीसारखे अनुभवी खेळाडू आहेत, पण त्याच संघात तमिळनाडूचा युवा यष्टीरक्षक नारायण जगदीसन देखील आहे, ज्याने नुकतेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध आयपीएल पदार्पण केले.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाला खास काही करता आले नसले तरी त्याने मात्र पदार्पणातच सर्वांना प्रभावित केले. सुरुवातीलाच संघातील महत्त्वाच्या आणि अनुभवी खेळाडूंच्या विकेट्स गेल्यानंतर तो फलंदाजीसाठी आला होता, अशा वेळी त्याने २८ चेंडूत ३३ धावा केल्या.
नारायणची कारकीर्द
२०१६ मध्ये नारायणने मध्यप्रदेश विरुद्ध तमिळनाडूकडून पदार्पण केले होते आणि पदार्पण सामन्यातच तो सामनावीर ठरला होता. त्याने आतापर्यंत २३ प्रथम श्रेणी आणि २३ अ दर्जाचे क्रिकेट सामने खेळले आहेत, तर २३ टी-२० सामने खेळले आहेत.
प्रथम श्रेणी सामन्यात नारायणने एकूण ११७४ धावा केल्या आहेत, ज्यात ४ शतके आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीत त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी १८३ धावांची खेळी आहे. जी त्याने यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी राजकोटमध्ये सौराष्ट्राविरुद्ध खेळली होती. अ श्रेणी सामन्यात त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकांसह एकूण ७९० धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये नारायणने २३ सामन्यात ३३८ धावा केल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत एकूण ७८ झेल घेतले असून ८ वेळा फलंदाजांना यष्टीचीत केले आहे.
त्याने २०१९ च्या तमिळनाडू प्रीमीयर लीगच्या हंगामात नारायण सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने ५६.७१ च्या सरासरीने ८ सामन्यात ३९७ धावा केल्या होत्या.
नारायणला मिळाली सीएसके संघात संधी
२०१८ मध्ये सीएसकेने नारायणला त्याच्या २० लाखांच्या बेस प्राइसवर खरेदी केले. संघात एमएस धोनीसारखा यष्टिरक्षक फलंदाज असला तरी एक युवा यष्टीरक्षक म्हणून तो संघात आहे. पुढे ज्यावेळी धोनी आयपीएलमधूनही निवृत्ती घेईल तेव्हा चेन्नई संघ यष्टीरक्षणासाठी नारायणवर विश्वास ठेवू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीची गाडी डगमगणार? गोलंदाजांना नडणारा रिषभ पंत ‘इतक्या’ दिवसांसाठी संघाबाहेर
IPL 2020 : आज बेंगलोर-कोलकाता येणार आमने सामने, पाहा सामन्याबद्दल सर्वकाही
धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीला गुजरातमधून अटक
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा