आयपीएल २०२० मध्ये विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सुरुवातीला शानदार कामगिरी केली. मात्र अखेरच्या टप्प्यात संघ संघर्ष करताना दिसला. त्यामुळे सध्या हा संघ १३ सामन्यांतील ७ विजयांसह १४ गुण मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे.
बेंगलोरसाठी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी अशी आहेत समीकरणे –
बेंगलोरचा साखळी फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सोमवारी(२ नोव्हेंबर) होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यातून गुणतालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा संघ निश्चित होणार आहे, म्हणजेच या सामन्यात जो संघ जिंकेल तो १६ गुणांसह प्लेऑफमध्ये जागा पक्की करेल. त्यामुळे बेंगलोरला हे सर्वात सोयीस्कर समीकरण असणार आहे की सामना जिंका आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करा.
मात्र, जर बेंगलोर दिल्ली विरुद्धच्या सामन्यात पराभूत झाले तर त्यांना मंगळवारी होणाऱ्या मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यावरही अवलंबून राहावे लागेल. तसेच हैदराबाद पराभूत होण्याची आशा करावी लागेल. या सामन्यात जर हैदराबाद हारले तर बेंगलोर १४ गुणांसह देखील प्लेऑफमध्ये सहज प्रवेश करतील.
पण जर हैदराबाद जिंकले तर मात्र त्यांना नेटरनरेटच्या आधारावर प्लेऑफमध्ये प्रवेश करावा लागेल. त्यांना दिल्लीविरुद्ध मोठा पराभव स्विकारुन चालणार नाही. कारण आधीच हैदराबादचा नेटरनरेट १४ गुण मिळवू शकणाऱ्या सर्व संघांत जास्त आहे. त्यामुळे बेंगलोरला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर त्यांनी दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि १६० धावा केल्या तर दिल्ली या धावांचा पाठलाग करण्यासाठी कमीतकमी १७.३ षटकांचा कालावधी घेईल. तसेच जर त्यांनी आधी गोलंदाजी केली, तर त्यांना हा सामना २१ किंवा कमी धावांनी पराभूत व्हावे लागेल. तरच ते नेटरनरेटच्या आधारावर प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतील.
या आयपीएल२०२० मधील ५० व्या सामन्यानंतर आयपीएलची गुणतालिका अर्थात पॉईंट टेबल-
१- मुंबई इंडियन्स: (सामने १३, विजय ९, पराभव ४, गुण १८, नेट रन रेट +१.२९६)
२- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : (सामने १३, विजय ७, पराभव ६, गुण १४, नेट रन रेट -०.१४५)
३- दिल्ली कॅपिटल्स : (सामने १३, विजय ७, पराभव ६, गुण १४, नेट रन रेट -०.१५९)
४- कोलकाता नाइट रायडर्स : (सामने १४, विजय ७, पराभव ७, गुण १४, नेट रन रेट -०.२१४)
५- सनरायझर्स हैदराबाद : (सामने १३, विजय ६, पराभव ७, गुण १२, नेट रन रेट +०.५५५)
६- किंग्स XI पंजाब : (सामने १३, विजय ६, पराभव ८, गुण १२, नेट रन रेट -०.१६२)
७- चेन्नई सुपरकिंग्ज : (सामने १४, विजय ६, पराभव ८, गुण १२, नेट रन रेट -०.४५५)
८- राजस्थान रॉयल्स : (सामने १४, विजय ६, पराभव ८, गुण १२, नेट रन रेट -०.५५९)
महत्त्वाच्या बातम्या –
पंचाच्या ‘त्या’ एका चुकीच्या निर्णयामुळे आमची आयपीएल ट्रॉफी हुकली, केएल राहुलचे मोठे वक्तव्य
जर असे झाले तरच कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफसाठी ठरणार पात्र, असे आहे समीकरण
World Cup 11: अंतिम सामन्यातील धोनीच्या षटकारावर जॉस बटलरने दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’