बीसीसीआयने कालच आयपीएलच्या 13 व्या हंगामाला 15 एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. याआधी 29 मार्चपासून आयपीएलच्या 13व्या हंगामाची सुरुवात होणार होती. त्या अनुशंगाने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी त्याचबरोबर चेन्नईच्या काही खेळाडूंनी चेन्नईमधील एमएस चिदंबरम स्टेडियमवर सरावाला सुरुवात केली होती. मात्र, सध्या जगभर कोरोनाचा कहर पाहता या सराव सत्राला स्थगिती देण्यात आली आहे.
त्यापुर्वी 15 एप्रिलपर्यंत आयपीएलला स्थगित करण्याचाही निर्णय जाहीर झाला आहे. तर, परदेशी खेळाडूंचे व्हिसाही 15 एप्रिलपर्यंत अडवण्यात आले आहेत.
धोनीने जुलै 2019च्या वनडे विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एकही क्रिकेट सामना खेळलेला नव्हता. त्यामुळे धोनीच्या पहिल्या आयपीएल सराव सत्रावेळी त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती.
मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरसला जागतिक साथीचा आजार म्हणून घोषित केल्याने चेन्नई सुपर किंग्सनेही त्यांचे सराव सत्र स्थगित करण्याची घोषणा केली.
शिवाय, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील वनडे मालिका, ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका तसेच श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकाही रद्द करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
– एकावेळी जडेजाशी पंगा घेणाऱ्या संजय मांजरेकरांची बीसीसीआयकडून हकालपट्टी!
– Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक…
– …आणि द्रविड, लक्ष्मणने १९ वर्षांपुर्वी इतिहास घडवला!