आज पर्यंत इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल) मध्ये मिळालेल्या अपयशाला विसरून विराट कोहली आणि त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या १३ व्या मोसमात उतरणार आहेत.
आयपीएल बाबत कोहली(Virat Kohli) म्हणाला की ‘मला २०१६ सारखं समाधान वाटत आहे. आमचा संघ सर्व संघांपेक्षा संतुलित संघ आहे. यावेळी आम्ही आयपीएल किताब जिंकू शकतो.’ तो आरसीबी च्या यूट्यूब शो “बोल्ड डायरीज” मध्ये बोलत होता.
२०१६ च्या मोसमात आरसीबी अंतिम सामान्यपर्यंत पोहचला होता. परंतू सनरायझर्स हैद्राबादकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.परंतू त्या मोसमात कर्णधार कोहलीने ४ झणझणीत शातकांसह ९७३ धावांचा रतीब घातला होता. असं असूनही संघाला विजेतेपद मिळवता आले नाही. कोहली आणि एबी डिविलियर्स सारखे(AB De Villiers) दिग्गज खेळाडू असूनही गेल्या तीन मोसमात संघाला उपांत्य फेरीही गाठता आली नाही.
आयपीएलचा कोणताही दबाव नाही
पुढे कोहली म्हणाला ‘मला आणि डिविलियर्सला वाटते की या मोसमात संघाला नक्कीच यश मिळू शकते. तो म्हणाला की मला मोसमाच्या अगोदर एवढं समाधान कधीच वाटलं नव्हतं. एबीलाही तसच फील होत आहे. आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन आला आहे. जर आयपीएलच्या वातावरणाचा विचार केला, तर मला अधिक चांगले आणि संतुलित वाटत आहे.’
भूतकाळ विसरून खेळणार हा मोसम
आरसीबीचा कर्णधार म्हणाला की ‘यापूर्वी जे घडले, ते आम्ही विसरून या मोसमात कोणत्याही दबावाशिवाय खेळू. आम्ही असं यापूर्वीही केले आहे. आमच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत, आणि लोकं त्यांना खेळताना पाहण्यास उत्सुक असतात. यामुळे चाहत्यांना संघाकडून अपेक्षा आहेत.’
तो म्हणाला की माईक हेसनला(Mike Hesson) संघाचा मुख्य प्रशिक्षक बनविणे हा एक चांगला निर्णय आहे. ते संघ व्यवस्थापन आणि खेळाडू यांच्यात पुल म्हणून काम करतात. अशा परिस्थितीत आयपीएलमध्ये एक संघ म्हणून यश मिळालं नसलं तरी टीम मॅनेजमेंटच्या आत्मविश्वासामुळे मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकेल.
कोहलीने सांगितले की, जर हेसनला कोणत्याही विषयावर चर्चा करायची असेल तर ते बोलू शकतात. त्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.आणि संवादाच नेहमीच स्वागत आहे, असं ही तो म्हणाला.
Teaser: Virat Kohli Interview Part 2 on Bold Diaries@imVkohli shares his thoughts on the RCB set up and the exciting season ahead. Head to the RCB Official App for the full interview. 📲
https://t.co/pSssixwMtW#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/cOF4qImS08
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 7, 2020
विराट कोहलीची आयपीएल कारकीर्द
आयपीएलच्या इतिहासात कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १७७ सामन्यात १३१.६१ च्या स्ट्राइक रेटने ५४१२ धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ५ शतकंही केली आहेत. यापैकी ४ शतके त्यांनी २०१६ च्या मोसमात झळकावली आहेत.
ट्रेंडिंग लेख –
त्याला फटकेबाजी करताना रोखणे केवळ अशक्य, आम्हाला प्लॅनच बदलावा लागणार
मॅक्सवेल संघात असल्याने सर्वोत्तम अष्टपैलूला पंजाब संघात स्थान मिळणे झाले महाकठीण
वडिलांबरोबर वेळ घालविण्यासाठी आयपीएलचा सर्वात मोठा स्टार काही सामन्यातून बाहेर
महत्त्वाच्या बातम्या –
जर तेव्हा टी-२० क्रिकेट असते तर, हे ५ दिग्गज खेळाडू ठरले असते हिरो
आयपीएलमधील असे ५ मोठे विक्रम जे मोडणे आहे अशक्य
२०२०मध्ये बेंगलोर शंभर टक्के जिंकणार आयपीएल परंतू या ३ सुधारणा केल्यावरच