मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामात आज(24 सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघ आमने-सामने असतील. दोन्ही संघांचा या हंगामातील हा दुसरा सामना आहे. हा सामना आज भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाईल.
विराट कोहली कर्णधार असलेला बेंगलोर संघ विजयाची लय कायम ठेवू इच्छित असेल. त्यांनी पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला होता. तर केएल राहुल कर्णधार असलेला पंजाब संघ पहिल्या विजयासाठी जोर देईल. त्यांना पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
आजच्या सामन्यात दोन्ही संघांमध्येही काही बदल पाहिले जाऊ शकतात. आज दोन्ही संघातील कोणत्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकेल, यावर एक नजर टाकूया.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:
आरसीबीसाठी देवदत्त पडिक्कल आणि ऍरॉन फिंच पुन्हा एकदा डावाची सुरुवात करू शकतात. त्याचबरोबर मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, शिवम दुबे, मोईन अली यांना दिली जाऊ शकते. याशिवाय गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, उमेश यादव आणि डेल स्टेन यांना संधी मिळू शकेल.
फलंदाज: देवदत्त पडिक्कल, आरोन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स
यष्टिरक्षक: पार्थिव पटेल
अष्टपैलू: शिवम दुबे, मोईन अली
गोलंदाज: युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, उमेश यादव आणि डेल स्टेन
किंग्स इलेवन पंजाब:
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर पंजाब काही बदल करु शकतो. केएल राहुल आणि ख्रिस गेल डावाची सुरवात करताना दिसू शकतात. त्याचबरोबर मधल्या फळीत पुन्हा मयंक अगरवाल, करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान यांच्यावर संघाचा विश्वास आहे. याशिवाय, गोलंदाजीत कृष्णप्पा गॉथम, रवी बिश्नोई, ख्रिस जॉर्डन, शेल्डन कोट्रेल, मोहम्मद शमीही असू शकतात.
फलंदाज: ख्रिस गेल मयंक अगरवाल, करुण नायर, सरफराज खान
यष्टीरक्षक: केएल राहुल (कर्णधार)
अष्टपैलू: ग्लेन मॅक्सवेल
गोलंदाजः कृष्णाप्पा गॉथम, रवी बिश्नोई, ख्रिस जॉर्डन, शेल्डन कोट्रेल, मोहम्मद शमी






