मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम युएईला पोहोचली आहे. संघाचा कर्णधार विराट कोहलीने दुबईला पोहोचल्यानंतर पहिला फोटो शेअर केला आणि त्याला गर्विष्ठ म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
वास्तविक आरसीबीने सोशल मीडियावर टीम रवाना होतानाचा फोटो शेअर केला, पण त्या फोटोत कर्णधार विराट कोहली कुठेही दिसला नाही.
त्यानंतर कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियावर जोरदार टोल ट्रोल करण्यात आले. फॅन्सने त्याला गर्विष्ठ खेळाडू म्हणून टीका केली. संघासोबत कर्णधार न दिसल्याने चाहते देखील हैराण झाले.
— Virat Kohli (@imVkohli) August 21, 2020
कोहली दुबईला एकटा पोहोचला आहे की संघाबरोबर याची अद्याप खात्री झालेली नसले, तरी बाकीचे खेळाडू त्याच दिवशी युएईला पोहोचले.
रॉयल चॅलेंजर्स युएईला पोहोचणारा सहावा संघ होता. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादची टीम शनिवारी युएईला पोहोचले.