दुबईत रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात कोलकाता कोलकाता नाईट रायडर्सने 60 धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. कोलकाता संघातील पाच खेळाडूंनी केलेल्या झुंजार खेळी पुढे राजस्थानच्या संघाचा निभाव लागू शकला नाही आणि त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता पकडावा लागला.
‘करो वा मरो’ च्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांनी 7 गडी गमावून 191 धावा उभ्या केल्या. 192 धावांचा पाठलाग करताना राजस्थान संघाला 9 गडी गमावून फक्त 131 धावा बनवता आल्या. या लेखात आपण राजस्थानला नमवणाऱ्या कोलकाताच्या त्या 5 खेळाडूंबद्दल माहिती घेणार आहोत.
1. ऑयन मॉर्गन
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गनने निर्णायक सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. नितीश राणा आणि सुनील नरेण दोघेही शून्य धावेवर परतल्यानंतर मॉर्गनने 35 चेंडूंत महत्त्वपूर्ण 68 धावा केल्या. यात ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे.
2. पॅट कमिन्स
कोलकाताचा स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा प्रत्येक सामन्यांत खेळताना दिसत आहे. मात्र त्याच्याकडून विशेष असे प्रदर्शन अपेक्षित असतानाही ते झाले नव्हते. रविवारी झालेल्या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच बळी घेत राजस्थानला गारद करून टाकले. महत्वपूर्ण अशा सामन्यात त्याने ४ गडी बाद केले.
3. शिवम मावी
वेगवान गोलंदाज शिवम मावीने देखील राजस्थानविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. त्याने फेकलेल्या चार षटकांत संजू सॅमसन आणि कार्तिक त्यागीचा बळी घेतला. मावीने किफायतशीर गोलंदाजी करीत मात्र 15 धावा दिल्या.
4. वरुण चक्रवर्ती
भारतीय संघात निवड झालेला वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. त्याने चार षटकांत किफायतशीरपणे 20 धावा देत जॉस बटलर आणि राहुल तेवतियाला बाद केले.
5. शुबमन गिल
कोलकाता संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने पुन्हा एकदा आपली छाप सोडली आहे. नितीश राणा शून्यावर गेल्यानंतर त्याने राहुल त्रिपाठीसोबत महत्त्वपूर्ण 72 धावांची भागीदारी केली. गिलने या सामन्यात 24 चेंडूत 36 धावा केल्या.
ट्रेंडिंग लेख-
-सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ
-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
महत्त्वाच्या बातम्या-
-नाईकी ऐवजी आता ‘हा’ लोगो दिसणार टीम इंडियाच्या जर्सीवर
-अय्यरच्या दिल्ली सेनेला प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी द्यावी लागेल अग्निपरिक्षा, अशी आहेत समीकरणे
-IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर