नवी दिल्ली। राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी (११ ऑक्टोबर) आयपीएल २०२० च्या २६ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. हैदराबादने दिलेल्या १५९ धावांचे आव्हान राजस्थानने निर्धारित २० षटकातील एक चेंडू राखून पार केले. यादरम्यान राजस्थानकडून फलंदाजी करताना शेवटच्या ५ षटकात राहुल तेवतिया आणि रियान पराग या फलंदाजांनी शानदार भागीदारी रचली आणि आपल्या संघाला हंगामातील तिसरा विजय मिळवून दिला.
राजस्थानच्या विजयाचा हीरो तेवतिया ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यानंतर त्याने राशिद खानचा सामना करण्याच्या योजनेबद्दल सांगितले आहे. तेवतियाने २८ चेंडूत नाबाद ४५ धावा कुटल्या, तर दुसरीकडे रियान परागनेही मोलाचे योगदान देत २६ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ८५ धावांची भागीदारी रचली.
तेवतिया म्हणाला, “मला जी भूमिका दिली होती, त्याची मी खूप वेळापासून वाट पाहत होता. मी थोडा संघर्ष करत होतो. परंतु मला विश्वास होता की, मी गोलंदाजांना योग्यप्रकारे हीट करू शकतो. सरावादरम्यान मी असे अनेकवेळा केले होते. मला माझी भूमिका माहिती होती, हे माझ्यासाठी चांगले होते. मला एका बाजूने डाव सांभाळायचा होता. सोबतच अशा चेंडूंची वाट पाहत होतो, ज्यावर मला चौकार- षटकार ठोकता येतील.”
‘राशिद खानविरुद्ध मी रिव्हर्स स्वीप खेळलो’
“मला माहिती होते आणि मला स्वत: वर विश्वास होता की, मी हे करू शकतो. मी रियानला म्हटले की, खेळपट्टी धीम्यागतीची आहे, आपण जितका वेळ फलंदाजी करू, तितकीच आपल्यासाठी विजयाची शक्यता वाढेल. जर शेवटच्या ४ षटकात ५० धावांची आवश्यकता असली, तर आम्ही मोठमोठे फटके मारू शकतो. रियान मला म्हणाला की, चांगल्या चेंडूंचा सन्मान कर आणि सिंगल्स घेत राहू. राशिद खानविरुद्ध मी रिव्हर्स स्वीप खेळलो.”
महत्त्वाच्या बातम्या-
-व्वा रे मुंबईकर! दिल्लीविरुद्धचा सामना रोहित शर्मासाठी ठरला खूपच ‘खास’, कसं ते पाहा
-अखेर मुंबई विरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळाली संधी; पाहा असा आहे ११ जणांचा दिल्ली संघ
-बेंगलोरविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर ‘या’ माजी क्रिकेटरचा रायडूवर चढला पारा, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा