आयपीएल २०२० चा ४३ वा सामना शनिवारी (२४ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना पंजाब संघाने १२ धावांनी जिंकला. मागील सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत संघाला सामना जिंकून देणारा मनीष पांडे झेलबाद झाला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
झाले असे की, प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने ७ विकेट्स गमावत १२७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबाद संघाचे पहिले ३ खेळाडू ६७ धावांमध्येच तंबूत परतले. त्यामुळे संघाचा पुढील डाव मनीष पांडे आणि विजय शंकर यांनी सांभाळला. पण पंजाबचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन टाकत असलेल्या १७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मनीष पांडेने चेंडू बाऊंड्रीच्या दिशेने टोलवला. हा चेंडू पाहून असे वाटत होते की, नक्कीच षटकार जाईल.
परंतु तेवढ्यात जे सुचिथने वेगाने धावत उडी घेतली आणि चेंडू झेलला. त्यामुळे मनीषला तंबूचा रस्ता धरावा लागला. त्याने २९ चेंडूंचा सामना करताना केवळ १५ धावा केल्या.
https://twitter.com/realsingh13/status/1320058615231725569
https://twitter.com/DaebakAnkita/status/1320057781882220550
https://twitter.com/Vishnani_Amit/status/1320057951999021056
https://twitter.com/predict_22/status/1320057565900951552
https://twitter.com/ram574/status/1320058231566311431
राजस्थानविरुद्ध खेळलेल्या मागील सामन्यात मनीष पांडेने दमदार खेळी करत नाबाद ८३ धावा कुटल्या होत्या.
हैदराबाद संघाचा पुढील सामना मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-छा गये पांडेजी ! राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर ट्विटरवर मनीष पांडेच्याच नावाचा कल्ला
-“आर्चरने तिसरे षटक फेकले असते तर…”, राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर मनीष पांडेची प्रतिक्रिया
-ट्विटर वॉर!! धुव्वांदार विजयानंतर हैदराबादने राजस्थानला डिवचलं, ‘असा’ घेतला बिर्यानीचा बदला
ट्रेंडिंग लेख-
-‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
-“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
-तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!