---Advertisement---

विरेंद्र सेहवागने तयार केला सर्वोत्तम आयपीएल संघ, विराट कोहली कर्णधार तर रोहित शर्मा…

---Advertisement---

इंडिंयन प्रीमीयर लीग २०२०ची सांगता मंगळवारी(१० नोव्हेंबर) झाली. या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मिळवले. हे मुंबई इंडियन्सचे विक्रमी पाचवे विजेतेपद होते. हा हंगाम संपल्यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने त्याचा सर्वोत्तम आयपीएल२०२० चा १२ जणांचा संघ निवडला आहे. त्याच्या संघात स्टार खेळाडूंचा भरणा आहे.

क्रिकबझ वेबसाईटशी बोलताना विरेंद्र सेहवागने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीला किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलला संधी दिली आहे. केएल राहुल यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १४ सामन्यात ६७० धावा केल्या. तर पडीक्कल यंदाचा सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरला. त्याने ४७३ धावा केल्या.

याबरोबरच सेहवागने तिसऱ्या क्रमांकासाठी मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादवला निवडले आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला निवडले आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की ५ व्या क्रमांकावर सेहवागने डेविड वॉर्नरला निवडले आहे आणि ६ व्या क्रमांकावर एबी डिविलियर्सला स्थान दिले आहे.

याबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला, ‘सुर्यकुमार यादवने सलग तीन हंगामात शानदार कामगिरी केली आहे. विराट कोहली आक्रमक खेळाडू आहे. त्यामुळे तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. त्यानंतर डेविड वॉर्नर फलंदाजी करेल. सहाव्या क्रमांकासाठी चांगली स्पर्धा होती. कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या देखील यासाठी पर्याय होते. पण मी यंदाच्या कामगिरीवरुन एबी डिविलियर्सला निवडेल.’

तसेच सेहवाग कर्णधार वॉर्नर की कोहली या दोघांपैकी कोणाला करावं यासाठी गोंधळात पडला होता. पण त्याने कोहलीला कर्णधार नेमलं. याबद्दल तो म्हणाला, ‘मी विराट कोहली की डेविड वॉर्नर यांच्यापैकी कोणाला कर्णधार निवडावं यासाठी गोंधळलो होतो. पण मी विराट कोहलीला कर्णधार करेल. कारण तो सलामीला आणि मधल्या फळीत, असे दोन्ही ठिकाणी फलंदाजी करु शकतो.’

गोलंदाजीमध्ये सोहवागने कागिसो रबाडा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांची निवड केली, तर युजवेंद्र चहल आणि राशिद खान या फिरकीपटूंना त्याने त्याच्या संघात स्थान दिले. याबरोबरच मुंबईचा युवा क्रिकेटपटू इशान किशनला सेहवागने १२ व्या खेळाडूच्या रुपात त्याच्या संघात स्थान दिले.

विशेष म्हणजे या संघात सेहवागने यंदाच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला मात्र त्याच्या संघात स्थानच दिले नाही.

विरेंद्र सेहवागचा सर्वोत्तम आयपीएल २०२० चा संघ –

केएल राहुल, देवदत्त पडीक्कल, सुर्यकुमार यादव, विराट कोहली(कर्णधार), डेविड वॉर्नर, एबी डिविलियर्स, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, राशिद खान, इशान किशन(१२ वा खेळाडू)

महत्त्वाच्या बातम्या –

विराट, डिविलियर्स संघात असूनही सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत RCB तळाशी ; वाचा अव्वल स्थानी कोण

‘म्हणलं होतं मामू यांचं गणित कमजोर आहे’, मुंबईच्या विजयानंतर रोहितकडून जुना व्हिडिओ शेअर

‘ड्वेन ब्रावो तू आता माझ्या मागे राहिलास’, असे का म्हणाला पोलार्ड, घ्या जाणून

ट्रेंडिंग लेख –

मिशन डॉट बॉल! रशिद, बोल्ट सर्वाधिक डॉट बॉल फेकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत; ‘हा’ गोलंदाज अव्वल स्थानावर

ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण

‘त्या’दिवशी कोणत्याही खेळाडूला आवडणार नाही अशा पद्धतीने बाद झाला विराट कोहली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---