---Advertisement---

‘तेरे गाल मोठे, या मेरे’ युवीचा रोहित आणि पंतला टोमणा; ट्विट व्हायरल

On: रविवार, नोव्हेंबर 1, 2020 6:56 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेला आयपीएलचा १३वा हंगाम प्ले ऑफच्या दिशेने मजल मारत आहे. मात्र मुंबई इंडियन्सने सर्वप्रथम प्ले ऑफमधील त्यांचे स्थान पक्के केले आहे. तर दूसरीकडे गुणतालिकेत टॉप-३ मध्ये असलेले दिल्ली आणि बेंगलोर संघ अजूनही प्ले ऑफसाठी झगडताना दिसत आहेत. अशातच मुंबई इंडियन्सने अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्वीट केले. त्यांच्या त्या ट्विटला माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंगने खूप मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई इंडियन्सने रविवारी (१ नोव्हेंबर) ट्विट केले की, ‘आम्ही अजूनही रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्यातील षटकार मारणाऱ्या स्पर्धेची वाट पाहत आहोत!’ या कॅप्शनसह त्यांनी हसतानाचा एक इमोजीही शेअर केला आहे.

मुंबईच्या या ट्विटला युवराज सिंगने अत्यंत गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, ‘ही षटकार मारण्याची स्पर्धा असेल का गालावरची चरबी मोजण्याची.’ एवढ्यावर तो थांबला नाही. तर मुंबईच्या ट्विटमधील त्या फोटोला पाहून युवराजने प्रतिक्रिया दिली की, ‘रोहित पंतला तुझे गाल मोठे आहेत का माझे?, असे विचारतोय.’

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1322869587419955200?s=20

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1322869880488484866?s=20

थोडक्यात सांगायचे झाले तर, युवराजने रोहित आणि पंतला त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे टोमणा मारला आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर रोहित आणि पंतला त्यांच्या वाढत्या वजनामुळे ट्रोल केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धावा तर केल्या पण.. कोहली, वॉर्नरनंतर आता केएल राहुलने केला ‘हा’ अनोखा विक्रम

भारतीय कर्णधार असलेल्या संघांनी करावा प्लेऑफमध्ये प्रवेश, पाहा कोण म्हणतंय असं

“तीन पराभवानंतर सलग 3 सामने जिंकूही शकतो”, बेंगलोरच्या दिग्गजाला आहे विश्वास

ट्रेंडिंग लेख-

एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’

ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण

सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---