आयपीएल २०२१ साठीचा लिलाव चेन्नई येथील ग्रँड चोला हॉटेल येथे सुरु आहे. ख्रिस मॉरिस व ग्लेन मॅक्सवेल हे आंतरराष्ट्रीय दिग्गज अनुक्रमे १६.२५ कोटी व १४.२५ कोटी इतकी बोली घेऊन पहिल्या सत्रात सर्वात महागडे खेळाडू ठरले. अनपेक्षितपणे, ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज जे रिचर्डसन याने आश्चर्यकारकरित्या मोठी रक्कम मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
या संघाचा भाग झाला रिचर्डसन
ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित खेळाडू असलेला रिचर्डसन या लिलावात १.५० कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह सहभागी झाला होता. अनेक संघांना दर्जेदार वेगवान गोलंदाजाची आवश्यकता असल्याने अनेक संघ त्यासाठी बोली लावताना दिसले. मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांनी त्यावर बोली लावण्यास सुरुवात केली. मुंबई मागे पडल्यानंतर पंजाब किंग्सने त्यामध्ये रस दाखवत अखेरपर्यंत किल्ला लढवला. अखेरीस, १४ कोटी रूपयांच्या या महागड्या रकमेसह पंजाब संघाचा भाग झाला.
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज आहे रिचर्डसन
ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या संघाचा सदस्य असलेला रिचर्डसन ऑस्ट्रेलियाकडून आत्तापर्यंत १३ वनडे व ९ टी२० सामने खेळला आहे. त्यामध्ये त्याने अनुक्रमे २४ व ९ बळी मिळविले आहेत. यावर्षी तो प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होईल.






