नोव्हेंबर २०२० मध्ये आयपीएलच्या तेराव्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. यासह त्या मोसमाचा शेवट झाला. परंतु त्यानंतर २ महिन्यातच आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे बिगूल वाजले आहेत. आयपीएलच्या चौदाव्या पर्वाचा लिलाव येत्या १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे लिलावाची जोरदार तयारी चालू आहे. सर्वच माध्यमातून या लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या असून या पर्वात १०९७ खेळाडूंनी आपले नाव नोंदणी केली आहे ज्यात ८१४ भारतीय तर २८३ विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
लिलावापूर्वी सर्व फ्रेंचायजीनी आपल्या संघातून मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलच्या चौदाव्या पर्वात एकूण अकरा खेळाडूंनी आपली आधारभूत किंमत दोन कोटी इतकी ठेवली आहे. परंतु यातील काही खेळाडूंना कदाचीत फ्रँचायझींकडून एवढ्या २ कोटीं रुपयांसाठी पसंती मिळू शकण्याची शक्यता कमी आहे. या लेखात आपण अशाच काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात ज्यांना कदाचित फ्रँचायझींची पसंती मिळणार नाही.
१) केदार जाधव
साल २०२० च्या आयपीएल हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या केदार जाधवला चेन्नई संघाने लीलावापूर्वी मुक्त केले होते. त्यांनी त्याला सन २०१८ च्या लिलावात ७.८० करोड रुपयामध्ये खरेदी केले होते. पण केदारला चेन्नईकडून फार मोठा प्रभाव पाडता आला नाही.
आता पुन्हा एकदा केदार जाधवने आपली आधारभूत किंमत दोन कोटी इतकी ठेवून आपले नाव लिलावसाठी नोंदविले आहे. परंतु जाधवनी गेल्या काही हंगामात काही खास प्रदर्शन केले नसल्याने क्वचितच एखादा संघ केदार जाधव याला दोन कोटीमध्ये विकत घेईल.
मागील हंगामात त्याने केवळ ८ सामने खेळले असून फक्त ६२ धावा त्याच्या खात्यात होत्या आणि एकही बळी हस्तगत करण्यास तो यशस्वी ठरला नाही.
२) मार्क वुड
साल २०१८ च्या चेन्नईच्या संघात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड याचा समावेश होता. परंतु २०१९च्या अगोदरच ह्या क्रिकेटपटूला त्यांनी मुक्त केले होते. त्यानंतर तो २०१९ आणि २०२० चा हंगाम खेळला नाही. आता त्याने २०२१ साठी आपली आधारभूत किंमत त्याने दोन कोटी इतकी ठेवली असून आपल्या नावाची लिलावासाठी नोंदणीसुद्धा केली.
साल २०१९ मध्ये त्याने आपली लिलावाची किंमत १ करोड ठेवली असूनपण त्याला कोणत्याच संघाने विकत घेतले नाही, त्यानंतर २०२० मध्ये सुद्धा त्याने लिलावसाठी नाव नोंदविले होते, परंतु ५० लाखांमध्ये सुद्धा त्याला कोणी विकत घेतले नाही. पण आता त्याने २ कोटी स्वत:ची किंमत ठेवल्याने त्याला कोणता संघ पसंती देईल, याची शक्यता कमी आहे.
३) लियाम प्लंकेट
साल २०१८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलांजद रबाडाच्या बदल्यात लियाम प्लंकेटला समाविष्ट केले होते. ज्यावेळी रबाडा फिट झाल्यावर पुन्हा संघात परतला तेव्हा दिल्ली संघाने त्यालासुद्धा मुक्त करत लिलावाचा मार्ग दाखविला. त्यावेळी लियाम प्लंकेट याने ७ सामने खेळला असून ४ बळी त्याच्या नावावर आहेत
मागील दोन वर्षे सलग तो आपले नाव लिलावसाठी नोंदणी करत असून सुद्धा कोणत्याच संघाने त्याला विकत घ्यायला रस दाखविला नाही आणि अशा परिस्थितीत क्वचितच असा एखादा संघ असेल जो यंदा त्याला २ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक किंमत देऊन विकत घेईल.
महत्त्वाच्या बातम्या –
…ज्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये ४५ मिनिटांत अवघ्या १५ धावांवर संपला होता एका संघाचा संपूर्ण डाव
अरेरे! घरच्या मैदानवरच आली वॉशिंग्टन सुंदरवर वाईट वेळ, विनोद कांबळीच्या नकोशा विक्रमाची केलीय बरोबरी