---Advertisement---

अंतिम षटकात मॅच विनिंग गोलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वरचा डिविलियर्सविरुद्ध होता ‘हा’ प्लॅन, वाचा

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 11:52 AM
---Advertisement---

बुधवारी (६ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अवघ्या ४ धावांनी विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. पण भुवनेश्ववर कुमारच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादने सामन्यात विजय मिळवला. सामना संपल्यानंतर भुवनेश्वरने शेवटच्या षटकात एबी डिव्हिलियर्सला धावा करण्यापासून कसे रोखले याचा खुलासा केला आहे.

सामन्यातील विजयानंतर भुवनेश्वर कुमार म्हणाला, “माझा हात ठीक आहे. एक झेल सुटल्यानंतर मी तीन वेळा मार खाल्ला. जेव्हा एबी फलंदाजी करत होता, तेव्हा मी या पूर्ण प्रक्रियेबाबत विचार करत होतो. मी वाइड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्टंपवर एक यॉर्कर टाकला आणि एबीने त्यावर षटकार मारला. तरीही मी पुन्हा वाइड यार्कर टाकला. जर तुम्ही तीन स्थानांवरील धावसंख्या पाहिली, तर ती जास्त राहिलेली नाही. आम्ही जो विचार केला होता, त्यापेक्षा या मैदानावर १०-१५ धावा कमी करू शकलो.”

दरम्यान, सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १४१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीला शेवटच्या पाच षटकांमध्ये ४४ धावांची आवश्यकता होती. देवदत्त पडिक्कल राशिद खानच्या गोलंदाजीवेळी झेलबाद झाला. एबी डिव्हिलियर्सने राशिद खानला एक आणि शाहबाज अहमदने उमरान मलिकला दोन चौकार मारले. त्यानंतर आरसीबीला शेवटच्या दोन षटकांमध्ये १८ धावांची आवश्यकता होती. अशात होल्डरने शाहबाजला बाद केले, ज्याने १४ धावा केल्या. होल्डरने त्याच्या षटकात केवळ पाच धावा दिल्या.

भुवनेश्वरच्या शेवटच्या षटकात आरसीबीला फक्त १३ धावांची आवश्यकता होती. त्याने षटकातील पहिले तीन चेंडूत फक्त एक धाव दिली. त्यानंतर त्याच्या चौथ्या चेंडूवर डिव्हिलीयर्सने एक षटकार मारला. पाचवा चेंडू पुन्हा निर्धाव गेला आणि शेवटच्या चेंडूवर आरसीबीला फक्त एक धाव घेता आली.

आरसीबीला या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांची टॉप २ मधील जागा पक्की झाली आहे. आरसीबी सध्या गुणतालीकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

चूकीला माफी नाही! कोहलीच्या लाडक्या सिराजने सोडला सोपा झेल, कर्णधाराने मैदानातच ऐकवलं

‘मी धावबाद करतो’, म्हणत विराटची स्टंप्सकडे धाव; मग झालं असं काही की मॅक्सवेल-चहलने उडवली खिल्ली

विलियम्सनचा हवेतून अचूक डायरेक्ट हिट आणि उडून पडल्या दांड्या, बघा मॅक्सवेलची ‘गेम चेंजर’ विकेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---