गुरुवारी (३० सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४४ वा सामना पार पडला. सामन्यात चेन्नईने हैदराबादवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी या सामन्यात त्याच्या जुन्या अंदाजामध्ये खेळताना दिसला आहे. त्याने सामन्याचा शेवट षटकार मारून केला. त्याचा हा षटकार पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सामना सुरु असताना समालोचन करणारे सुनील गावसकर आणि केविन पीटरसन यांनीही धोनीच्या विजयी षटकाराचे कौतुक केल आहे.
धोनीच्या षटकारानंतर सुनील गावसकरांनी त्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “धोनी नेहमी असा करतो. तो सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाते. जेव्हा सामना खूप रोमांचक होतो, तेव्हा तो सामना जिकंवतो. एमएस धोनीने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा असे केले आहे.”
केविन पीटरसननेही केले धोनीचे कौतुक
समोलोचन करणाऱ्या केविन पीटरसननेही एमएस धोनीच्या या षटकाराचे कौतुक केले आहे. या षटकारानंतर विरोधी संघानी घाबरले पाहिजे, असे त्याने सांगितले आहे. तो म्हणाला, “धोनी अनेक वर्षांपासून असे करत आला आहे. तो सतत असे करत चालला आहे आणि त्याने ज्याप्रकारे या सामन्यात षटकार मारला आहे, त्यामुळे विरोधी संघांनी घाबरले पाहिजे. तो मागच्या दोन हंगामांपासून फार्ममध्ये नाही आणि आता जर अशाप्रकारे खेळायला सुरुवात केली तर, समजून घ्या चेन्नई सुपर किंग्जचा एक हात ट्रॉफीवर पोहोचला आहे. या परिस्थितीत तो खूप चांगला संघ आहे.”
दरम्यान, शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये १३४ धावा केल्या होत्या. वृद्धिमान साहाने सर्वाधिक ४४ धावा केल्या. हैदराबादने दिलेल्या १३५ धावांचे लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नईने चार विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.४ षटकांमध्ये हे लक्ष्य गाठले. कर्णधार धोनीने अप्रतिम षटकार मारून सामन्याचा शेवट केला. धोनीने या सामन्यात ११ चेंडूत १४ धावा केल्या. तसेच ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ४५ धावांची, तर फाफ डू प्लेसिसने ४१ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ आहे चेन्नईच्या यशाचे प्रमुख कारण; वरिष्ठ खेळाडूने केला खुलासा
आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विक्रम करण्यासाठी हर्षलला चालावी लागणार केवळ सात पाऊले
आगरकर पाठोपाठ रोहित-रहाणेही ‘बॉम्बे डक’ होण्याच्या मार्गावर; वाचा सविस्तर