---Advertisement---

CSK vs RCB : जडेजा पडला आख्ख्या आरसीबी संघावर भारी! चेन्नईचा बेंगलोरवर ६९ धावांनी दमदार विजय

On: रविवार, एप्रिल 25, 2021 7:17 PM
Ravindra-Jadeja
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा १९ वा सामना आज (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी विरुद्ध सीएसके) यांच्यात झाला. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेल्या या सामन्यात चेन्नईने ६९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९१ धावा केल्या आणि बेंगलोरला १९२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरला २० षटकात ९ बाद १२२ धावाच करता आल्या.

चेन्नईने दिलेल्या १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगलोरकडून विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल उतरले. यावेळी सुरुवातीपासूनच पडीक्कलने आक्रमक खेळ केला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणारा विराट ७ चेंडूत ८ धावा करुन सॅम करनच्या गोलंदाजीवर चौथ्या षटकात यष्टीरक्षक एमएस धोनीकडे झेल देऊन बाद झाला. त्यापाठोपाठ पाचव्या षटकात १५ चेंडूत ३४ धावांवर खेळत असलेल्या पडीक्कलला शार्दुल ठाकूरने बाद करत बेंगलोरला दुसरा धक्का दिला.

यानंतर मात्र, बेंगलोरच्या फलंदाजांच्या नियमित अंतराने विकेट्स गेल्या. त्यात केवळ ग्लेन मॅक्सवेलने २२ धावा करत थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला रविंद्र जडेजाने ९ व्या षटकात त्रिफळाचीत केले. त्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरही जडेडाच्या गोलंदाजीवर ७ व्या षटकात ७ धावांवर जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. पुढे जडेजाने अफलातून क्षेत्ररक्षणाचेही प्रदर्शन करत डॅनिएल ख्रिस्टिनला धावबाद केले. एवढेच नाही तर ११ व्या षटकात जडेजाने गोलंदाजी करताना धोकादायक एबी डिविलियर्सला ४ धावांवर त्रिफळाचीत करत बेंगलोरला मोठा धक्का दिला.

यानंतरही बेंगलोरचे तळातील फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. १२ व्या षटकात हर्षल पटेलला शुन्यावर, तर १४ व्या षटकात नवदीप सैनीला २ धावांवर इम्रान ताहीरने बाद केले. तसेच ताहीरनेच काईल जेमीसनला १६ व्या षटकात धावबाद करत बेंदलोरला ९ वा धक्काही दिला. जेमीसन १३ चेंडूत १६ धावा करुन बाद झाला. पण अखेर मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहलले किल्ला लढवत शेवटची विकेट जाऊ दिली नाही. सिराज १२ धावांवर आणि चहल ८ धावांवर नाबाद राहिले.

चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर इम्रान ताहिरने २ विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि सॅम करनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

जडेजा-डू प्लेसिसचे अर्धशतक

फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या सलामीवीरांची चेन्नईला दमदार सुरुवात मिळवून दिली. या दोघांनीही एकमेकांना योग्य साथ देत अर्धशतकी भागीदारीही रचली. पण अखेर १० व्या षटकात युजवेंद्र चहलने ऋतुराजला बाद करत ७४ धावांची भागीदारी तोडली. ऋतुराज २५ चेंडूत ३३ धावा करुन बाद झाला. तो बाद झाल्यानंतर सुरेश रैना फलंदाजीला आला.

त्याने डू प्लेसिसला चांगली साथ दिली. दरम्यान डू प्लेसिसने आयपीएलमधील सगल दुसरे अर्धशतक केले. मात्र, रैना १८ चेंडूत २४ धावा करुन १४ व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठच्या चेंडूवर लगेचच डू प्लेसिसही ४१ चेंडूत ५० धावांवर बाद झाला.

यानंतर अंबाती रायडू आणि रविंद्र जडेजाने चेन्नईचा धाव पुढे नेला. त्यांची भागीदारी रंगत असतानात रायडू मोठा फटका मारयच्या नादात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर १८ व्या षटकात ७ चेंडूत १४ धावा करुन बाद झाला. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी मैदानात आला. त्याने जडेजाला साथ दिली. पण अखेरच्या दोन षटकात जडेजाचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला. त्याने अखेरच्या षटकात एका नो बॉलसह ५ षटकात आणि १ चौकार मारत एकूण ३७ धावा वसूल केल्या. त्यामुळे त्याने त्याचे अर्धशतही पूर्ण केले. त्यामुळे चेन्नईने २० षटकात ४ बाद १९१ धावा केल्या. जडेजा ४ चौकार आणि ५ षटकारांसह २८ चेंडूत ६२ धावांसह नाबाद राहिला. तर धोनी २ धावांवर नाबाद राहिला.

बेंगलोरकडून हर्षल पटेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि युजवेंद्र चहलने १ विकेट घेतली.

नाणेफेकीचा कौल सीएसकेच्या पारड्यात

सामन्यापुर्वी उभय संघात नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल सीएसके संघाच्या बाजूने लागला. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी सीएसकेचा अष्टपैलू मोईन अलीला विश्रांती देण्यात आली. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. याबरोबरच लुंगी एन्गिडीच्या जागी इम्रान ताहीरला संधी देण्यात आली.

आरसीबी संघात डेनियल ख्रिस्टीयनचे पुनरागमन झाले. याबरोबरच डेथ ओव्हर स्पेशलिस्ट नवदीप सैनीलाही अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळाले. शाहबाज अहमद आणि केन रिचर्डसन यांना बाकावर बसवत या दोन खेळाडूंना सामील करण्यात आले आहे.

असा आहे सीएसकेचा संघ-
ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार), अंबाती रायुडू, रविंद्र जडेजा, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, इम्रान ताहीर

असा आहे आरसीबीचा संघ-
देवदत्त पडीक्कल, विराट कोहली (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, एबी डीविलियर्स, वाशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, डेनियल ख्रिस्टीयन, कायल जेमिसन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---