आयपीएल २०२० चा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने एक मोठा निर्णय घेतला होता. जो त्यांच्यासाठी खूपच महागडा आणि चूकीचा ठरला. त्यांनी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला मुंबई इंडियन्ससोबत ट्रेड केले होते. त्यामुळे बोल्ट मुंबईसाठी खूपच फायदेशीर ठरला. बोल्टने या हंगामात चमकदार कामगिरी केली. मुंबईसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. सोबतच अंतिम सामन्यात त्याने दिल्लीविरुद्ध ३ विकेट्स घेत मुंबईला आयपीएलचे पाचवे विजेतेपद जिंकून दिले. दिल्ली संघ व्यवस्थापन पुढील हंगामापूर्वी आपली ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करेल.
दिल्लीकडे आधीच सर्वोत्तम संघ आहे. अशामध्ये ते बोल्टला पुन्हा संघात घेण्याचा प्रयत्न करतील. दिल्लीकडे ट्रेंट बोल्टला संघात सामील करण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे, तो म्हणजे मेगा ऑक्शन (मोठा लिलाव).
आयपीएल २०२१ पूर्वी होऊ शकते मेगा ऑक्शन
आयपीएल २०२१ पूर्वी मेगा ऑक्शन होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. कारण पुढील हंगामात एक नवीन फ्रँचायझी संघ स्पर्धेत सामील होण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी आयपीएलचे आयोजन एप्रिल-मे महिन्यात युएईत होऊ शकते. तरीही बीसीसीआयला पुढील आयपीएलचे आयोजन भारतात करायचे आहे. परंतु यावर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
मेगा ऑक्शन झाले, तर केवळ ५ खेळाडू संघ वाचवू शकेल
मेगा ऑक्शनपूर्वी प्रत्येक संघाला ५ खेळाडू सोडून पूर्ण स्क्वॉडला मुक्त करावे लागेल. फ्रँचायझी ३ खेळाडूंना रिटेन करू शकते. सोबतच राईट टू मॅच कार्डमार्फत आणखी दोन खेळाडूंना संघात घेता येऊ शकेल. परंतु याव्यतिरिक्त सर्व खेळाडू ऑक्शन पूलमध्ये जातील.
असे झाले तर सर्वाधिक संघ आपल्या मुख्य खेळाडूंना संघात ठेवण्याचा प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्ससारख्या संघासाठी हा मेगा ऑक्शन चिंतेचा विषय ठरू शकतो, तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघाला मेगा ऑक्शनमध्ये फायदा होऊ शकतो. कारण ते त्यांच्या संघात बदल करण्याच्या विचारात असतील.
बोल्टची आयपीएल २०२०मधील कामगिरी
बोल्टने या हंगामात १५ सामने खेळले. यात त्याने १८.२८ च्या सरासरीने २५ विकेट्स आपल्या खिशात घातले. यासोबतच तो या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. पहिल्या क्रमांकावर कागिसो रबाडा असून त्याने ३० विकेट्स घेतल्या आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर बोल्टचा संघसहकारी जसप्रीत बुमराह असून त्याने २७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-भारीच ना! आयपीएल २०२१मध्ये असणार ‘इतके’ संघ, तब्बल ७६ सामन्यांची प्रेक्षकांना मेजवानी?
-विरेंद्र सेहवागने तयार केला सर्वोत्तम आयपीएल संघ, विराट कोहली कर्णधार तर रोहित शर्मा…
-‘ड्वेन ब्रावो तू आता माझ्या मागे राहिलास’, असे का म्हणाला पोलार्ड, घ्या जाणून
-“आता खूप झालं, आता काही वर्ष थांबा”, भारतीय दिग्गज क्रिकेटपटूचा मुंबई इंडियन्सला सल्ला






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर