---Advertisement---

… म्हणून ब्रावो आणि फाफने सीपीएलमध्ये गायलेले ‘चेन्नई बॉईज’ गाणे; स्वतः सांगितले कारण

On: शुक्रवार, ऑक्टोबर 1, 2021 8:44 AM
---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्जचे दिग्गज खेळाडू फाफ डू प्लेसिस आणि ड्वेन ब्रावो यांनी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये एका सामन्यादरम्यान नाणेफेक होण्यापूर्वी आपल्या आयपीएलमधील फ्रेंचायझीसाठी गाणे गायले होते. आता या दोघांनी त्या दिवसाची पुन्हा आठवण काढून दिली आहे. या सीपीएल सामन्यात ब्रावो आणि डू प्लेसिसने सीएसकेसाठी गाणे गायले होते. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या ट्वीटर खात्यावरून या दोघांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये दोघांनी सांगितले आहे की, त्यादिवशी काय घडले होते.

होय चेन्नई बॉईज आहोत

सीपीएलच्या या सामन्यात ड्वेन ब्रावो सेंट किट्स ऍंड नेविस पेट्रियट्स संघाचा कर्णधार होता. तसेच डू प्लेसिस सेंट लूसिया संघाचे नेतृत्व सांभाळत होता. चेन्नईने गुरुवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या दोघांनी त्या घटनेमागची संपूर्ण कथा सांगितली आहे. चाहत्यांना या दोघांचा तो अंदाज खूपच आवडला होता, जेव्हा हे दोघे सीएसकेसाठी सीपीएलच्या सामन्यात गाणे म्हटले होते. त्यावेळी ब्रावो आणि डू प्लेसिस म्हटले होते की, “वी आर द चेन्नई बाॅईज ऍंड मेकिंग ऑल द नाॅइस वेयरेवर वी गो.”

चेन्नईने शेअर केलेल्या व्हिडिओत डू प्लेसिसने सांगितले आहे की, “जेव्हा आम्ही नाणेफेक करण्यासाठी चाललो होतो तेव्हा, ज्या व्यक्तीने नाणेफेक आयोजित केली होती तो म्हणत होती की, सीएसकेचे दोन खेळाडू.” यावर ब्रावो म्हणतो, “तेव्हा मी विचार केला की, चेन्नई संघाचे गाणे गायले तर कसे राहील, ‘वी आर द चेन्नई बाॅईज.’ फाफनेही या गोष्टीसाठी होकार दिला आणि तेव्हा आम्ही ठरवले, जो कोणी नाणेफेक जिंकेल, तो गाणे सुरू करणार आणि समोरचा त्याला साथ देणार.”

डू प्लेसिसने पुढे सांगितले की, “नंतर आम्ही एकमेकांकडे पाहिले आणि विचार केला की, चला गाणे गाऊया. आम्हाला सीएसकेचा भाग असल्याचा गर्व आहे.” ब्रावोने सांगितले की, काहीही झाले तरी, सीएसकेच्या खेळाडूंचे नाते मजबूत राहील. तो पुढे म्हणाला, “सीएसकेचे नाते, कोणीही त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही. आम्ही आयपीएलच्या सर्वक्षेष्ठ फ्रेंचायझीचे प्रतिनिधित्व करून खुश आहोत आणि चेन्नई बाॅईज आहोत.”

सीपीएलच्या या सामन्यात डू प्लेसिसने ६० चेंडूत नाबाद १२० धावा केल्या होत्या. या सामन्यात सेंट लूसिया किंग्जने सेंट किट्स ऍड नेविस पेट्रियट्स संघाला १००० धावांनी पराभुत केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---