आयपीएल २०२१ च्या ३५ व्या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि विराट कोहलीच्या नेतृत्वातील राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आमना-सामना झाला. यामध्ये धोनीच्या सीएसकेने आरसीबीला सहा विकेट्स राखून मात दिली आहे. आरसीबीची सलामीवीर जोडी विराट आणि पडिक्कलने १११ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात दिली. मात्र, सीएसकेने त्यानंतर चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करत त्यांना १५७ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सीएसकेने त्यांच्या पावर प्लेमध्येच ५० धावा ठोकल्या. दरम्यान सलामीवीर फाफ डू प्लेसिसने एक अप्रतिम षटकार मारला आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
फाफचा अवाक करणारा दिलस्कूप
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सीएसकेचा सलामी फलंदाज फाफ डू प्लेसिस मैदानात आला. त्याने आरसीबीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला एक अप्रतिम षटकार लगावला, ज्याला पाहून सर्वच हैराण झाले. नवदीप सामन्यातील त्याच्या पहिल्याच षटकातील दुसरा चेंडू टाकत होता आणि समोर फलंदाजीसाठी डू प्लेसिस होता. डू प्लेसिसने त्याच्या या चेंडूवर जबरदस्त दिल स्कूप शाॅट मारला आणि तो चेंडू सीमारेषेपार गेला. डू प्लेसिसचा हा शाॅट चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
#FafDuPlessis #Saini #IPL2021 #CSKvsRCB pic.twitter.com/N65MIDrDRU
— Shubham Sharma (@Shubham73106588) September 24, 2021
डू प्लेसिसच्या या शाॅटमुळे सीएसकेचे चाहते उत्साहात दिसले. पण, दुसरीकडे आरसीबीचे चाहते यामुळे निराश झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर नवदीप सैनी जेव्हा त्याच्या दुसऱ्या षटकाची गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हाही डू प्लेसिसने त्याला आणखी एक षटकार मारला. डू प्लेसिसच्या या षटकारानंतर सैनीचे मनोबल खचले होते. डू प्लेसिसने मारलेल्या दिल स्कूप शाॅटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नईचा सफाईदार विजय
या सामन्यात आरसीबीला प्रत्युत्तर देताना सीएसकेचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड (३८) आणि फाफ डू प्लेसिस (३१) यांनी अर्थशतकी भागीदारी केली. मोइन अलीने २३ आणि अंबाती रायडूने ३२ धावांचे योगदान दिले. त्यानंतर सुरेश रैना १७ आणि धोनी ११ धावा करून सामन्यात नाबद राहीले. अखेरीस चेन्नईने सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्ज सध्या १४ गुणांसह पुन्हा एकदा गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचला आहे.