भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या नेहमीच त्याच्या स्टाईल आणि लुक्ससाठी चर्चेचा विषय ठरतो. नुकतीच त्याने इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत हार्दिकने डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा घातलेला दिसत आहे. त्याची ही इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोस्टच्या शेवटच्या फोटोत त्याने त्याच्या हातातल्या घड्याळाचा फोटो शेअर केला आहे. चाहत्यांच्या नजरा त्याच्या या नवीन घड्याळावर टिकल्या आहेत. हार्दिकने ज्या घड्याळाचा फोटो शेअर केला आहे, त्याची किंमत कोट्यांवधीमध्ये आहे.
हार्दिक सध्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची तयारी करण्यासाठी यूएईत दाखल झाला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, हार्दिकने अबु धाबीचा फेरफटका मारताना जे घड्याळ घातलेले आहे, त्याची किंमत ५ कोटी रुपये आहे. हार्दिकने घातलेले घड्याळ एका मोठ्या नामांकित ब्रँडचे (Patek Philippe Nautilus 5711 Platinum Emerald) आहे. या ब्रँडला खुप महागडा मानले जाते.
हार्दिककडे एकापेक्षा एक महागडी घड्याळे आहेत. त्याने ही घड्याळे वेळोवेळी घातलेली दिसतात. तो त्याच्या चाहत्यांसाठी नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.
https://www.instagram.com/p/CSg4tXHlRcK/?utm_source=ig_web_button_share_sheet
टी२० विश्वचषकात गोलंदाजी करताना दिसणार हार्दिक
हार्दिक पांड्याला मागच्या काही काळापासून गोलंदाजी करताना त्रास होत आहे. मात्र, तो टी२० विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी करताना दिसणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडलेला पारस म्हाम्ब्रेने सांगितले आहे की, तो टी २० विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होईल आणि गोलंदाजी करू शकेल. पारस म्हाम्ब्रेने हार्दिकच्या फिटनेसवर पूर्ण लक्ष ठेवलेले आहे. आयपीएल नंतर लगेच टी२० विश्वचषक आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याला त्याच्या गोलंदाजीचे व्यवस्थापन करावे लागणार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
हार्दिक पांड्या २०१९ च्या विश्वचषकानंतर पाठीच्या वेदनेशी झगडत आहे. गोलंदाजी करू शकत नसल्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघातील स्थान गमवावे लागले होते. भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर हार्दिकने गोलंदाजी केली होती. पण, तो त्यातल्या कोणत्याच सामन्यात त्याचा षटकांचा कोटा पूर्ण करू शकला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीजच्या एकाहून एक सरस गोलंदाजांना पाकिस्तानच्या यष्टीरक्षकाने दिल्या टिप्स, खेळाडूंना फुटलं हसू
फवाद आलमच्या शतकामागे आईचा आशीर्वाद, सामन्यापूर्वी फोनवर म्हणाली होती असं काही
सूर्या-पृथ्वीची ‘३६० डिग्री’ फटकेबाजी पाहण्याची सर्वांनाच आतुरता, पण नेमकं कोणाच्या जागी खेळवणार?