---Advertisement---

आयपीएल २०२१ उर्वरित हंगामापूर्वी युएई सरकारच्या ‘या’ नियमामुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझींना मोठा फटका

On: शनिवार, जून 26, 2021 6:11 PM
---Advertisement---

भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन हे यूएईला केले आहे, पण त्याआधी बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे. यूएईने भारतातून येणाऱ्या सर्व फ्लाईट्सवरील बंदी २१ जुलैपर्यंत वाढविली आहे.

त्यामुळे आता आयपीएल आयोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण फ्रँचायझींच्या काही सदस्यांना आधीच आयपीएल २०२१साठी यूएईला जायचे आहे आणि खेळाडूंसाठी हॉटेलव्यवस्था आणि इतर गोष्टींची तयारी करायची आहे. आता यूएईने भारतातून येणाऱ्या फ्लाईट्सवर बंदी घातली असल्याने आयपीएल फ्रँचायझी आणि बीसीसीआयसाठी नक्कीच अडथळा निर्माण झाला आहे.

यूएईने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये भारतासह १३ देशांच्या प्रवासी उड्डाणांवरील बंदी वाढवली आहे, असे जनरल सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीने म्हटले आहे. या १३ देशांमधून येणाऱ्या फ्लाईट्सवर २१ जुलैपर्यंत प्रतिबंद कायम राहील. म्हणजे आयपीएल २०२१ च्या तयारीसाठी यूएईला जाण्याचा विचार करणाऱ्या बीसीसीआयचे अधिकारी आणि आयपीएल फ्रँचायझीयांना २१ जुलैआधी निघण्याच्या योजनांमध्ये बदल करावा लागेल .

आयपीएल २०२१ चे उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळले जातील
आयपीएल २०२१ भारतात एप्रिल-मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती, पण आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या काही खेळाडू आणि कर्मचारी वर्गचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उर्वरित ३१ सामने हे पुढे ढकलावे लागले. बीसीसीआयने आता यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान पुढील सामने होणार असल्याचे जाहीर केले आहे. आयपीएल २०२१ मध्ये २९ सामने भारतात खेळले गेले आहेत, तर अंतिम सामन्यासह ३१ सामने यूएईमध्ये खेळले जातील.

आयपीएलची तयारी पूर्ण करायची फ्रँचायझींची असेल अपेक्षा
आयपीएल फ्रँचायझीला आयपीएल २०२१ ची तयारी पूर्ण करायची आहे, ज्यात खेळाडूंचा यूएईमधील राहण्याची व्यवस्था आहे. एका अहवालानुसार, आयपीएल फ्रँचायझीशी संबंधित अधिकारी लवकरच यूएईला जाण्याचा विचार करत होते. आता यूएईने भारतातून फ्लाईट्सवरील प्रतीबंद वाढवले असून, फ्रँचायझींना यूएईला जाण्याचे आयोजन पुढे ढकलावे लागतील.

महत्वाच्या बातम्या

बायको असावी तर अशी! बुमराहसाठी पत्नी संजनाने बनवले ‘रोमँटिक जेवण’, फोटो होतोय व्हायरल

कसोटी अजिंक्यपदमध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज, अंतिम सामन्यात फ्लॉप ठरलेल्या बुमराहचाही समावेश

किवी खेळाडूचा संघाला घरचा आहेर; म्हणे, ‘१३९ धावा करायला इतका वेळ लागेल वाटले नव्हते’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---