आयपीएलच्या मैदानात शुक्रवारी(१ ऑक्टोबर) पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जने पाच विकेट्स राखून कोलकाता नाइट रायडर्सवर मात केली. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने या सामन्यात चांगली खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाची कामगिरी पार पाडली. याबरोबरच त्याने एक खास विक्रमाला गवसणी घातली.
त्याने या सामन्यात दोन षटकार मारले आणि या षटकारांच्या जोरावर तो पंजाब किंग्जसाठी १०० षटकार मारणारा पहिला फलंदाज बनला आहे. सामना संपल्यानंतर त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले.
पंजाब किंग्जसाठी १०० षटकार मारणारा राहुल पहिला फलंदाज
केकेआरविरुद्धच्या सामन्यात राहुलने ५५ चेंडूत ६७ धावांची महत्वाची खेळी केली. यामध्ये त्याने मारलेल्या चार चौकार आणि दोन षटकारांचीही समावेश आहे. या षटकारांच्या जोरावर तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक षटकार करणारा खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये राहुलपाठोपाठ पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दुसरा नंबर ख्रिस गेलचा लागतो. त्याने आतापर्यंत एकूण ९२ षटकार मारले आहेत. तसोच डोविड मिरलनेही पंजाबसाठी ८७ षटकार मारण्याची कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
१०० – केएल राहुल
९२ – क्रिस गेल
८७ – डेविड मिलर
७८ – ग्लेम मॅक्सवेल
७८ – शाॅन मार्श
आयपीएल २०२१ मध्ये राहुलने सर्वाधिक वेळा केले अर्धशतक
राहुलने केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याचे अर्धशतक पूर्ण केले आणि आपयपीएलच्या चालू हंगामात सर्वाधित वेळा अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत पाच वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. या यादीत राहुलने ग्लॅन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस या दोघांना मागे सोडले आहे. या दोघांनी या चालू हंगामात आतापर्यंत प्रत्येकी चार अर्धशतक केले आहेत.
आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत राहुल पहिल्या स्थानावर
केकेआरविरुद्धच्या दमदार खेळीनंतर राहुल हंगामातीत सर्वाधिक धावा करणाऱ्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या हंगामात ११ सामन्यांमध्ये ४८९ धावा केल्या आहेत. या यादीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. धवनने ११ सामन्यात ४५४ धावा केल्या आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसन आहे. सॅमसनने ११ सामन्यांमध्ये ४५२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जागा एक दावेदार चार! आता रंगणार प्ले ऑफसाठी खरा महासंग्राम; जाणून घ्या सर्व गणिते
टी२० विश्वचषकासाठीच्या श्रीलंका संघात बदल; ‘हे’ नवे पाच खेळाडूही करणार युएई वारी
अशक्य ते शक्य करून दाखवतो, तो आहे धोनी…! कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट स्टंपिंग, पाहा एकाच व्हिडिओत