पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात बुधवारी (१३ एप्रिल) २३ वा सामना पार पडणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा हा हंगामातील पाचवा सामना असेल, तर पंजाब किंग्सचा देखील हा पाचवा सामना असणार आहे.
मुंबई इंडियन्सला अद्याप आयपीएलच्या १५ व्या हंगामात विजयाचे खाते खोलण्याची प्रतिक्षा आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात पराभवाचा सामना केला आहे. त्यामुळे आता त्यांना विजयी मार्गावर परतण्याची अपेक्षा असेल. तसेच पंजाबने आत्तापर्यंत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी २ सामने जिंकले असून २ सामने पराभूत झाले आहेत.
असे असतील संभावित ११ जणांचे संघ
विजयाची आस असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (MI Predicted XI) विचार करायचा झाल्यास मोठा बदल होण्याची शक्यता नाही. कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) इशान किशन सलामीला उतरताना दिसू शकतात, तर मधल्या फळीतील जबाबदारी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मावर असू शकते. तसेच अष्टपैलू म्हणून कायरन पोलार्डसह या सामन्यासाठी फॅबियन ऍलेनला संघी दिली जाऊ शकते. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मुरुगन अश्विन बासिल थंम्पीसह जयदेव उनाडकट किंवा टायमल मिल्स यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.
मयंक अगरवालच्या (Mayank Agarwal) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्स संघाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्याही अंतिम ११ जणांच्या (PBKS Predicted XI) संघात फार बदल होण्याची शक्यता नाही. त्यांच्याकडून सलामीला मयंक अगरवाल आणि शिखर धवन ही जोडी उतरेल, तर मधल्या फळी जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, शाहरुख खान हे जबाबदारी सांभाळू शकतात. ओडीयन स्मिथला अष्टपैलूची भूमिका निभावयला लागू शकते. तसेच गोलंदाजीत पंजाबकडे कागिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि वैभव अरोरा यांसारखे पर्याय आहेत.
आमने-सामने
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात (Mumbai Indians vs Punjab Kings) आत्तापर्यंत २७ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १४ सामने मुंबई इंडियन्सने जिंकले असून १३ सामन्यात पंजाब किंग्सने विजय मिळवला आहे.
हवामान आणि खेळपट्टी
मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे (MCA Stadium, Pune) येथे सामना होणार आहे. या मैदानातील खेळपट्टीवर सुरुवातीला फलंदाजांना मदत मिळत असली तरी येथे फिरकीपटूंचेही वर्चस्व बऱ्याचदा दिसून येते.
तसेच या सामन्यादरम्यान पुण्यातील हवामान उष्ण असेल. तापमान साधारण ३० ड्रिग्री सेल्सियस असेल, तर आद्रताही फार नसेल. त्यामुळे दवाचा परिणाम फारसा जाणवणार नाही. असे असले तरी आत्तापर्यंतचे आयपीएल सामन्यांतील निकाल पाहिले, तर नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचाच निर्णय घेऊ शकतो.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) मुंबई विरुद्ध पंजाब (MI vs PBKS) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामना १३ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे, पुणे येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, रमणदीप सिंग, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, बासिल थम्पी, टायमल मिल्स, डॅनियल सॅम्स, फॅबियन ऍलन, अनमोलप्रीत सिंग, संजय यादव, रिले मेरेडिथ, मयंक मार्कंडे, टिम डेव्हिड, आर्यन जुयाल, अर्जून तेंडूलकर, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान.
पंजाब किंग्ज संघ: मयंक अगरवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग, बेनी हॉवेल, भानुका राजपक्षे, संदीप शर्मा, ऋषी धवन, बलतेज सिंग, रितिक चॅटर्जी, प्रेरक मंकड, ईशान पोरेल, अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, अंश पटेल, राज बावा.
महत्त्वाच्या बातम्या –
उथप्पा आणि दुबेची आयपीएलमधील ऐतिहासिक भागीदारी; ‘या’ यादीत गाठला थेट अव्वल क्रमांक
कुटुंबातून मिळत होते एका पाठोपाठ एक धक्के; पण पठ्ठ्याने क्रिकेटमध्ये पडू दिला नाही खंड, पाहा व्हिडिओ
‘संघ योग्य दिशेने पुढे चाललाय, मलाही प्रभाव पाडायचाय’, दिल्लीच्या धाकड खेळाडूचं वक्तव्य