---Advertisement---

‘मी धावबाद करतो’, म्हणत विराटची स्टंप्सकडे धाव; मग झालं असं काही की मॅक्सवेल-चहलने उडवली खिल्ली

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 11:12 AM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि युजवेंद्र चहल यांच्यात चांगली बॉडिंग आहे, ही गोष्ट सर्वानाच माहीत आहे. अनेकदा मैदानावर आणि मैदानाबाहेर दोघांना मस्ती करताना पाहिले गेले आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या आयपीएल २०२१ मधील ५२ व्या सामन्यातही या दोघांमध्ये अशीच एक मजेशीर घटना घटली आहे. सनरायझर्स हैदराबादने या सामन्यात ४ धावांनी विजय मिळवला.

सनरायझर्स हैदराबाद फलंदाजी करत असताना हैदराबादच्या वृद्धिमान साहाने युजवेंद्र चहलच्या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेने एक शॉट खेळला. शॉट मारल्यानंतर हैदराबादचे फलंदाज दोन धावा घेण्यासाठी धावले. आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. मॅक्सवेलने हा चेंडू अडवला आणि नॉन स्ट्राइकच्या दिशेने फेकला. यादरम्यान आरसीबीचा कर्णधार विराटने चहलला बॅकअप देण्याऐवजी तो स्वत: चेंडू पकडण्यासाठी स्टंपजवळ आला आणि चहलला थ्रो येण्यापूर्वी बाजूला केले.

विराटने चहलला बाजूला केले, पण तो मॅक्सवेलने फेकलेला चेंडू पकडू शकला नाही. यानंतर मॅक्सवेलने विराट ज्याप्रकारे खेळाडूंकडून चुका झाल्यावर चिडतो, अगदी त्याच प्रकारे चिडण्याचे अनुकरण केले. मॅक्सवेलने केलेले अनुकरण पाहून चहलनेही त्याला प्रतिसाद दिला आणि विराटप्रमाणेच कंबरेवर हात ठेवून चिडण्याची ऍक्शन केले. चहल आणि मॅक्सवेलने केलेल्या या अनुकरणामुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले.

https://twitter.com/jabjabavas/status/1445774144428150793?s=20

दरम्यान, सामन्यात हैदराबादने आरसीबीवर चार धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीला आरसीबीने नाणेफेक जिंकली आणि हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये १४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी २० षटकांमध्ये १३७ धावा करू शकला आणि परिणामी संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सने सामन्यात २९ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या आणि त्याला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच निवडले गेले.

महत्त्वाच्या बातम्या-

विलियम्सनचा हवेतून अचूक डायरेक्ट हिट आणि उडून पडल्या दांड्या, बघा मॅक्सवेलची ‘गेम चेंजर’ विकेट

विश्वचषक २००३ मध्ये ७ षटकात ६७ धावा ते २०११ ला ३ मेडन ओव्हर टाकणाऱ्या झहीरचा आज बड्डे

सीएसकेच्या ताफ्यात रोहित शर्माच्या भिडूची एन्ट्री, घेणार दुखापग्रस्त सॅमची जागा; वाचा त्याच्याबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---