आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला क्रिस मॉरिस पुन्हा एकदा मोठ्या टी20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. क्रिस मॉरिस आता वेस्ट इंडिजच्या कैरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2021) खेळणार आहे. क्रिस मॉरिसला बारबाडोस ट्राइटेंड्सनी आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे.
आयपीएल 2021 मध्ये क्रिस मॉरिसचा 16.25 कोटी रुपयांना लिलाव झाला होता. राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने इतकी मोठी रक्कम खर्च करून त्याला आपल्या संघात घेतले होते. परंतु त्याला एक सामना सोडला तर बाकी कोणत्याही सामन्यात उत्तम कामगिरी करता आली नाही. क्रिस मॉरिसने गोलंदाजीमध्ये उत्तम प्रदर्शन केले. त्याने 7 सामन्यात 14 बळी घेतले. याबरोबरच फलंदाजीने 24 च्या सरासरीने अवघ्या 48 धावा काढल्या. आयपीएल स्थगितीनंतर आता बारबाडोस ट्राइटेंड्सने मोठ्या आशेने त्याच्यासोबत करार केला आहे.
क्रिस मॉरिसव्यतिरिक्त जेसन होल्डर, शे होप, समीर पटेल, थिसारा परेरा यांसारखे खेळाडू पण संघात सहभागी आहेत. बारबाडोस ट्राइटेंड्सने या हंगामात एकूण 9 खेळाडूंना रिटेन केले आहे.
सात पाकिस्तानी खेळाडूंचाही सीपीएल 2021मध्ये सहभाग
कैरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL 2021) मध्ये 7 पाकिस्तानी खेळाडूंसोबत देखील करार केला आहे. आजम खान आणि मोहम्मद आमिर हेसुद्धा बारबाडोस ट्राईडेट्स संघाकडून खेळणार आहेत. वहाब रियाज आणि उस्मान कादिर सेंट लसिया जोक्स संघाकडून खेळणारर आहेत. मोहम्मद हाफिज हा गयाना अमेजन वॉरियर्स संघाकडून खेळणार आहेत. हैदर अली जमैका तलायव्हाज संघाकडून खेळणार आहे.
क्रिस मॉरिसची टी20 कारकिर्द
क्रिस मॉरिसने 21 डिसेंबर 2012 रोजी न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेकडून टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 23 टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्त्व केले असून 34 विकेट्स घेतल्या आहेत.
बारबाडोस ट्राइटेंड्स संघ
जेसन होल्डर, रेमन राइफर, काइल मेयर्स, शे होप, जस्टिन ग्रीव्स, जोशुआ बिशप, हेडन वॉल्श, जॉनसन चार्ल्स, नईम यंग, मोहम्मद आमिर, क्रिस मॉरिस, शफीउल्लाह गाफरी, समित पटेल, आजम खान, थिसारा परेरा, ओशाने थॉमस, एश्ले नर्स.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत कोहलीपेक्षा जास्त ‘या’ व्यक्तीचा संघ, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे लक्षवेधी भाष्य
पुनरागमन अशक्य! असे ३ क्रिकेटपटू, ज्यांच्यासाठी भारतीय संघाची दारे कायमची झाली बंद
टॉप-३ संघ, ज्यांच्यावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ओढावली पराभवाची नामुष्की; भारत ‘या’ स्थानी