जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी उड्डाण भरणार आहे. तिथे त्यांना सुरुवातीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. १८ ते २२ जून दरम्यान द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. त्यानंतर ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडशी दोन हात करणार आहे. तत्पुर्वी अष्टपैलू रविंद्र जडेजा याने भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा फोटो चाहत्यांच्या भेटीला आणला आहे.
इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापुर्वी भारतीय संघाचे सर्व खेळाडू मुंबईत एकत्र जमले आहेत. तिथे त्यांना विगलीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान शनिवारी (२९ मे) जडेजाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय संघाच्या नव्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. याबरोबरच भारतीय खेळाडू ही जर्सी परिधान करुन कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.
जडेजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये भारतीय संघाची नवी जर्सी स्वेटरप्रमाणे असल्याचे दिसत आहे. यावर एका बाजूला निळ्या रंगामध्ये बीसीसीआयचा लोगो; तर दुसऱ्या बाजूला आयसीसी जागतिक कसोटी अंजिक्यपद अंतिम सामना २०२१ असे लिहिलेले आहे. याबरोबरच पुढे मोठ्या अक्षरात इंडिया असे नाव टाकले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही जर्सी ९०च्या दशकातील अर्थातच पारंपारिक अंदाजातील आहे.
जडेजाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘पुन्हा ९० च्या दशकात’ असे लिहिले आहे. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे.
https://twitter.com/imjadeja/status/1398509671653150722?s=20
भारतीय संघाचा ही नवीकोरी जर्सी प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्सने डिजाईन केली आहे. बीसीसीआयने नोव्हेंबर २०२० मध्ये एमपीएल स्पोर्ट्सला भारतीय संघाचा नवा प्रायोजक म्हणून निवडले होते.
भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे. साधारणत: २०१९ मध्ये आयसीसीने या स्पर्धेला सुरुवात केली होती. त्यानंतर मागील २ वर्षांत प्रदर्शनात सातत्य राखत भारतीय संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आता भारतीय संघाकडे न्यूझीलंडला पराभूत करत पहिलावहिला कसोटी अजिंक्यपद चषक आपल्या नावे करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टॉप-३ संघ, ज्यांच्यावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ओढावली पराभवाची नामुष्की; भारत ‘या’ स्थानी
धोनी की कोहली, कोण आहे श्रेष्ठ कर्णधार? १८ शतके करणाऱ्या माजी क्रिकेटपटूने दिले उत्तर
भारत कोहलीपेक्षा जास्त ‘या’ व्यक्तीचा संघ, इंग्लंडच्या माजी खेळाडूचे लक्षवेधी भाष्य





